कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही तुरळक अपवाद सोडला तर वैद्यकीय व्यवसाय करणारे अनेक डॉक्टर्स आपापल्या क्षमतेनुसार आपल्या स्वकमाईतील काही वाटा खर्च करून विविध उपक्रम राबवत असतात. त्यापैकीच एक कुडाळचे सुपूञ, आमचे परममित्र आणि ज्यानी अगदी वयाच्या ४५ व्या वर्षी आरोग्य क्षेत्रात उंच भरारी घेतलेली आहे ते डॉ. जी. टी. राणे.
कुडाळ हे असे शहर आहे की ज्या शहरात क्रिडा, नाट्य, साहित्य, उद्योग अशा विविध क्षेत्रात सातत्याने काही मंडळी कार्यरत असते. यापैकीच एक डाॅ. जी. टी. राणे. गेल्या वर्षापासून त्यांनी आपल्या ह्रदयाचे आरोग्य ठिक रहावे यासाठी मान्सून रन २०२४ चे आयोजन केले होते. तो उपक्रम कमालीचा यशस्वी झाला. विविध वयोगटातील सहभागीना पाच, दहा, पंधरा, सतरा की. मी रन करण्यासाठी नियोजन होते. गतवर्षी तब्बल साडेसातशे जणांनी सहभाग घेतला होता.
गेल्यावर्षी पेक्षा यावर्षीचे नियोजन हटके होते. राणे व त्यांच्या आग्रहाखातर पहाटे सव्वा पाच वाजता सहभागी होण्यासाठी सावंतवाडीहून निघालो आणि एक अतिशय चांगला उपक्रम अनुभवता आला. या मान्सून रनला झेंडा दाखवण्यासाठी मा. जिल्हाधिकारी अनिल पाटील साहेब, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री खेबुडकर साहेब, कुडाळ औधोगिक वसाहतीचे श्री अविनाश रेवणकर,माजी आमदार वैभव नाईक, भाजपाचे जिल्हाध्यक्ष, प्रभाकर सावंत, उपाध्यक्ष श्री रणजित देसाई, कुडाळ एम्. आय्. डि. सी. इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष श्री मोहन होडावडेकर, बॅ. नाथ पै संस्थेचे अध्यक्ष श्री उमेश गाळवणकर,श्री अमरसेन सावंत, भाजपाच्या महिला आघाडीच्या नेत्या सौ. संध्याताई तेरसे, भाजपाचे युवा नेते भाई सावंत, श्री राजू राऊळ आदी मान्यवरांच्या हस्ते झेंडा दाखवून या रनला सुरूवात झाली. या लक्षणीय रन मध्ये एकुण साडे बाराशेजण सहभागी झालेले असून जिल्ह्या बाहेरील तब्बल साडेसातशेजण सहभागी झाले.
मराठी संस्कृतीचा अविष्कार, लेझीम, ढोलपथक यामुळे या शुभारंभ सोहळ्यात एक वेगळेच वातावरण तयार झालेले होते. सर्वपक्षीय मंडळी एकत्र आल्याने काही मिश्किल संवादही ऐकायला मिळाले. माजी आमदार वैभव नाईक यांचे आगमन होताच भाई सावंत म्हणाले, चला आता तुम्ही जोरात पळा! यावर वैभव यांनी प्रभाकर सावंत यांच्याकडे पाहून मिश्किल टोला मारला, वैभवजी म्हणाले, “आता आम्ही यांना पळवत आहोत. आम्ही सध्या पळायचे थांबलोत!” यावर मी म्हणालो ,”वैभवजी सध्या रिचार्ज होत आहेत.” या संवादाला मा. जिल्हाधिकारी साहेबांसह सर्वानीच हसून दाद दिली.

कार्यक्रम यशस्वी झाला पण यासाठी गेले कित्येक दिवस झटणारे अनेक हात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे झटत होते.
या संकल्पनेचे शिल्पकार हे डॉ. जी. टी. राणे यांचे जेष्ठ बंधू अजीत राणे जे गेली अनेक वर्षे मलेशियाला असतात. या दोन्ही भावानी खरोखरच असे उपक्रम राबवून आजच्या घडीला कौटुंबिक ऐक्याचा एक आदर्श समाजासमोर उभा केलेला आहे. डॉ. जयसिंग राणे या उपक्रमाचे प्रेरणास्थान असून डॉ. प्रशांत मडव,डॉ.प्रशांत सांमत, आणि कुडाळच्या सर्वच उपक्रमात ज्यांचे नेहमीच सदैव सक्रिय योगदान असते ते बांधकाम व्यावसायिक श्री गजानन कांदळगावकर, जी. टी. राणे यांच्या उपक्रमांचा विशेष बुस्टर म्हणजे त्यांच्या सहधर्मचारिणी डॉ. सौ. सई राणे यांनी विशेष परिश्रम घेतले.
या मान्सून रन २५ च्या आयोजनासाठी आणखीन काही आधारस्तंभ म्हणून योगदान देणाऱ्यात श्री एस्. एम्. तेजम, अमीत तेंडोलकर,रूपेश तेली, शिवानंद राणे, प्रणव प्रभू, राज वारंग यांचा विशेष उल्लेख करणे क्रमप्राप्त आहे.
एकंदरीत , कुडाळ मान्सून रन २५ च्या आयोजनासाठी कार्यरत संपूर्ण टिमने अतिशय नेञदिपक आयोजन करून कुडाळच्या शिरपेचात आणखीन एक तुरा खोवला. डॉ. जी. टी. राणे कुटुंबियांचे आणि या आरोग्यविषयक जनजागृती करणाऱ्या उपक्रमास प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या आणि यात सहभागी होणाऱ्या सर्वाचे विशेष कौतुक.!


