सावंतवाडी : आमचे तरूण सहकारी सन्मानीय विकासभाई सावंत यांचे आकस्मित निधन झाल्याचे समजून अत्यंत दुःख झाले. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व आम्हा सर्वांचे राजकीय गुरू स्वर्गीय भाईसाहेब सावंत यांच्या प्रेरणेने विकासभाई आपल्या राजकीय, शैक्षणिक, सहकार व सामाजिक क्षेत्रात अत्यंत प्रामाणिपने व धडाडीने त्यांनी सर्व समाजाचे सेवाभावी राहून नेतृत्व केले आहे. त्यांच्या या आकस्मित निधनामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे फार मोठे नुकसान झाले आहे. स्व. विकास भाई यांनी माझे राजकीय जीवनामधे वेळोवेळी एक लहान भाऊ म्हणून मला अत्यंत मोलाची साथ दिली आहे, ती मी कदापि विसरू शकणार नाही. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही श्री देव पाटेकर चरणी प्रार्थना करतो.
मी सध्या अमेरिकेत मुलीकडे आलो आहे. त्यामुळे या दुःखद प्रसंगी दूर रहावे लागले आहे. विकासभाई यांच्या सर्व कुटुंबीयांचा दुःखात सहभागी आहे. अशी भावपूर्ण श्रद्धांजली प्रवीण प्रतापराव भोसले (माजी राज्यमंत्री तथा माजी आमदार सावंतवाडी) यांनी अर्पण केली आहे.
विकासभाई यांनी लहान बंधूप्रमाणे दिलेली साथ कदापि विसरणार नाही! : माजी राज्यमंत्री प्रवीण भोंसले.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


