सावंतवाडी : आमचे हक्काचे मार्गदर्शक विकासभाई आम्हाला आता कायमचे सोडून गेले, ही कल्पनासुद्धा सहन होत नाही. माझ्या सामाजिक आणि राजकीय जीवनात मला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे, अत्यंत अभ्यासू आणि संयमी तसेच सदैव पाठीवर कौतुकाची थाप देणारे मार्गदर्शक आज आम्ही गमावले आहेत. खऱ्या अर्थाने सिंधुदुर्ग जिल्ह्याची शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातील प्रचंड हानी झाली आहे. गट-तट आणि पक्ष यांच्या पलीकडे जाऊन समाजहिताचा ध्यास घेतलेले एक आदर्शवत व्यक्तिमत्त्व म्हणजे विकास भाई.
त्यामुळे गेली तीन दशके त्यांनी केलेलं कार्य हे आजच्या आणि येणाऱ्या तरुण पिढीसाठी प्रेरणास्थान ठरत आहे.
विशेषतः शिक्षण क्षेत्रात त्यांचे योगदान हे हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात दीपस्तंभासारखं कायम प्रकाशमान राहील.
त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणारी नाही.विकासभाई म्हणजे चालते बोलते विद्यापीठ होते. माझ्या आजपर्यंतच्या वाटचालीत मला कौतुकाने आणि अत्यंत नम्रतेने प्रेरणा देणारा माझा कुटुंबातील एक हळव्या मनाचा मार्गदर्शक आम्ही गमावला आहे. आमचे बंधू विक्रांत आणि संपूर्ण सावंत कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची श्री देव उपरलकर व श्री देव पाटेकर शक्ती देव, हीच प्रार्थना..!
स्वर्गीय भाईंच्या आत्म्यास चिरशांती लाभो…!
ओम शांती शांती..!
– अर्चना घारे – परब.


