रत्नागिरी : येथील स. रा. देसाई अध्यापक विद्यालयाचे उपक्रमशील प्राध्यापक सुनील जोपळे यांची जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या संवाद युनिटच्या सदस्य पदी निवड करण्यात आली आहे.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या संवाद युनिटमध्ये सामाजिक कार्यकर्त्याच्या नियुक्तीबाबत शासनाकडून प्रा. जोपळे यांना तसे निवडपत्र प्राप्त झाले आहे. त्यांच्या या स्तुत्य निवडीबद्दल त्यांचे विविध स्तरावरून अभिनंदन होत आहे.
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई.
नालसा (संवाद – सीमांत, असुरक्षित आदिवासी आणि विमुक्त/भटक्या जमातींसाठी न्यायाची उपलब्धता मजबूत करणे) योजना, २०२५.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी यांचे कार्यालयीन आदेश क्रमांक राजीविस प्रा/९९४/२०२५, दिनांक १७ जून २०२५.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी यांचे ११ जुलै २०२५ चे कार्यालयीन नोट आणि आदेशानुसार
देशभरातील आदिवासी समुदायांसमोरील महत्त्वाच्या आव्हानांना ओळखून, उपेक्षित, असुरक्षित आदिवासी आणि विमुक्त/भटक्या जमातींसाठी न्यायाची उपलब्धता मजबूत करण्यासाठी माननीय राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली आणि माननीय महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या NALSA (संवाद – सीमांत, असुरक्षित आदिवासी आणि विमुक्त/भटक्या जमातींसाठी न्यायाची उपलब्धता मजबूत करणे) योजना, २०२५ नुसार, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी यांनी आदेश संदर्भ क्रमांक ३ द्वारे संवाद युनिटची स्थापना केली आहे .


