नवी दिल्ली : जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. धनखड यांच्या या निर्णयानंतर आता दिल्लीत उपराष्ट्रपतीसाठी नव्या चेहऱ्याचा शोध घेतला जात आहे. असे असतानाच आता बिहार राज्यातीलच एका बड्या नेत्याची भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी भेट घेतली आहे. त्यामुळे ते आता बिहारच्या या नेत्याचे नाव उपराष्ट्रपतीपदाच्या रेसमध्ये आले आहे.
रामनाथ ठाकूर उपराष्ट्रपतीपदाचे संभाव्य उमेदवार?
धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर आता उपराष्ट्रपतीपदासाठी योग्य व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. सध्या या पदासाठी अनेक नेत्यांची नावे समोर येत आहेत. मात्र बुधवारी (23 जुलै) जे पी नड्डा यांनी राज्यसभेचे खासदार तथा केंद्रीय कृषीराज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांची भेट घेतली आहे. रामनाथ ठाकूर बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांचे पुत्र आहेत. नड्डा आणि ठाकूर यांच्या भेटीचा हा प्रसंग फारच विशेष मानला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार रामनाथ ठाकूर हे उपराष्ट्रपतीपदासाठीचे संभाव्य उमेदवार मानले जात आहेत. ठाकूर यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन तसेच अन्य वरिष्ठ नेते उपस्थित होते.
रामनाथ ठाकूर मोदींच्या जवळचे नेते –


