चेन्नई : विवाहित महिला परपुरूषाच्या प्रेमात पडतात आणि पतीचा किंवा मुलांचा जीव घेतात अशा अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. तामिळनाडूत अशीच एक घटना 2018 साली घडली होती. यात एका महिलेने प्रियकराच्या मदतीने पती आणि मुलांच्या हत्येचा कट रचला होता, यात ती यशस्वीही झाली. आता तिला आणि तिच्या प्रियकराला कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
हे संपूर्ण प्रकरणा सविस्तर असे, अबीरामी ही महिला पती आणि मुलांसह तामिळनाडूतील कांचीपुरम येथे राहत होती. तिचा पती बँकेत काम करत होता, तिला सात वर्षांचा मुलगा आणि चार वर्षांची मुलगी अशी दोन अपत्ये होती. अबिरामीला टिक टॉकवर व्हिडिओ बनवण्याची आणि बिर्याणी खाण्याची आवड होती. ति जवळच्या एका प्रसिद्ध बिर्याणी स्टॉलवरून बिर्याणी ऑर्डर करत असे.


