Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चेस वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखबाबत मोठी घोषणा!

मुंबई : नागपूरच्या दिव्या देशमुख हीने तिच्यापेक्षा वयाने अनेक वर्षांनी मोठ्या असलेल्या कोनेरू हंपी हीचा अंतिम सामन्यात पराभव करत वर्ल्ड चेस चॅम्पियन स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं. दिव्याने वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी हा कामगिरी केली आणि इतिहास घडवला. दिव्याच्या या कामगिरीनंतर तिचं अभिनंदन केलं जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या या मुलीचं पत्रकार परिषद घेत अभिनंदन केलं. फडणवीस यांनी या पत्रकार परिषदेत खेळाडूंसाठी काही नवीन योजना राबवता येतील काही हे पाहू, असं म्हटलं. तसेच मुख्यमंत्र्यांनी दिव्याबाबत मोठी घोषणा केली.

फडणवीस काय म्हणाले?

दिव्याने अंतिम सामन्यात भारताच्याच कोनेरू हंपी हीला पराभूत केलं. दिव्याने यासह चेस वर्ल्ड कप जिंकत भारतासह महाराष्ट्राचं नाव उंचावलं.

“मला अतिशय आनंद आहे की नागपुरची आणि महाराष्ट्राची दिव्या देशमुख हीने बुद्धीबळ जागतिक अजिंक्यपद स्पर्धा जिंकली आहे. दिव्याने ग्रँडमास्टरचा खिताबही प्राप्त केला आहे. दिव्या या स्पर्धेत विजय मिळवणारी सर्वात युवा खेळाडू ठरली आहे. दिव्याने याआधीही भारतासाठी अनेक पदकं जिंकली आहेत. दिव्याने अनेक स्पर्धेत सहभाग घेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. दिव्याने जवळपास 35 पदकं जिंकली आहेत. त्यात 23 सुवर्ण पदकांचा समावेश आहे”, असं म्हणत फडणवीस यांनी दिव्याच्या कामगिरीचं कौतुकं केलं. तसेच फडणवीसांनी उपविजेत्या कोनेरू हंपी यांचंही अभिनंदन केलं.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles