Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

अभिमानास्पद! – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी विलवडे गावचे सुपुत्र रामचंद्र उर्फ आबा दळवी.

सावंतवाडी :विलवडे गावचे सुपुत्र रामचंद्र उर्फ आबा धर्माजी दळवी यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आबा दळवी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य असुन उपाध्यक्ष पदापूर्वी ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी व सेक्रेटरीही होते.

आबा दळवी आपल्या व्यवसायानिमित्त नवी मुंबईत स्थायिक असून त्यांचे घराणे काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहे. दळवी यांचे वडील कै धर्माजी दळवी यांनीही काँग्रेस पक्षात महत्त्वाची पदे भूषविली. नवी मुंबई व विलवडे परिसराच्या शैक्षणिक, सामाजिक, क्रिडा, धार्मिक कार्यात आबा दळवी नेहमी अग्रस्थानी असतात. सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून त्यांनी अनेक समाजपयोगी उपक्रमांना तसेच गोरगरीबांना वेळोवेळी मदतीचा हात दिला आहे. आबा दळवी यांच्या या निवडीबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.
नवी मुंबई जिल्हा काँग्रेस सरचिटणीस तसेच पक्षात अनेक महत्त्वाच्या पदावर काम करून काँग्रेस वाढीसाठी त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. महाराष्ट्रसह इतर राज्यातील निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने दिलेली जबाबदारी आबा दळवी यानी चोखपणे पार पाडीत पक्षाला यश मिळवून दिले. पक्ष संघटनेतील त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles