- जिल्ह्याला एकच जिल्हाप्रमुख ठेवण्यास सावंतवाडी विभागाचा विरोध..!
- निरीक्षक असलेल्या बाळ माने यांच्या देखतच झाली खडा जंगी.
कुडाळ : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत पुन्हा एकदा जाहीर कार्यक्रमात गटातटाचे राजकारण दिसून आले. कुडाळ येथे आयोजित शिवबंधन परिक्रमा कार्यक्रमात निरीक्षक बाळ माने यांच्या समक्ष हे गट एका दुसऱ्या समोर भिडले. सावंतवाडी विभागाचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी आणि कणकवली विभागाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. निमित्त होते सतीश सावंत यांनी आपल्या भाषणात सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एकच जिल्हाप्रमुख असावा अशी केलेली मागणी. आणि त्या मागणीलाच अनुसरून बाबुराव धुरी यांनी केलेला विरोध आणि एकूणच विरोधाचे पर्यावरण सर्वान देखत व्यासपीठावर भांडणात झाले आणि हे भांडण मिठवता-मिठविता पदाधिकाऱ्यांना नाके नऊ आले.
बैठकीदरम्यान सतीश सावंत यांनी भाषणात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उबाठाला एकच जिल्हाप्रमुख असावा सावंतवाडीला दिलेला स्वतंत्र जिल्हाप्रमुख हे पद नसावे अशी मांडणी केली. आणि या मुद्द्यावरूनच बाबुराव धुरी जिल्हाप्रमुख म्हणून सावंतवाडी,वेंगुर्ले,दोडामार्ग या तालुक्याची कामगिरी पाहतात त्यांचा संताप उफाळून आला.सतीश सावंत यांना त्यांनी रोखले. कालांतराने जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी आपल्या भाषणात सतीश सावंतांच्या भाषणाची री ओढली. कार्यक्रमानंतर जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी आणि संदेश पारकर यांच्यात बाचाबाची झाली . सावंतवाडीचे जिल्हाप्रमुख पद आम्ही कदापिही देणार नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्याला दोन जिल्हाप्रमुख हे कायमच राहिले पाहिजेत. कोणत्याही व्यक्तीच्या हातात पक्षाची सगळी सूत्रे देणार नाही आणि ते आम्हाला मान्य नाही, अशा पद्धतीची भूमिका जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी ठासून मांडली.
सिंधुदुर्ग उबाठाच्या बैठकीत एकच जिल्हाप्रमुख करण्यावरून पुन्हा वाद पेटला! ; जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी – संदेश पारकर यांच्यात शाब्दिक द्वंद्व रंगले.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


