सुशील चौगुलेः गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनद्वारे केले तक्रार.
सावंतवाडी : शहरानजीक असलेल्या माजगाव ग्रामपंचायत हद्दीमधील गुलाबी तिठा येथील श्री. मोरजकर यांच्या घरामागील नवीन इमारत बांधकाम बेकायदेशीर संरक्षण भिंत अनधिकृत तात्काळ काढण्यासह माजगाव ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावर शिस्तभंग कारवाईसह निलंबनाची कारवाई व्हावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता व सजग नागरिक तथा सावंतवाडी तालुका माहिती अधिकार अध्यक्ष सुशील चौगुले यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे.
दरम्यान नैसर्गिक वाहणाऱ्या आहळ्याला मध्ये बदल करून इमारत बांधकाम व्यवसायिकाला अभय दिल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.




