Saturday, November 8, 2025

Buy now

spot_img

पिंगुळी येथे अवैध दारुसह २,८२,४००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त.

कुडाळ : आज दिनांक ०२/०८/२०२५ रोजी दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कुडाळ क्र. ०२ यांना मिळालेल्या खात्रीशीर बातमीनुसार दोन पंच आणि स्टाफसह असे सर्वजण मिळून पिंगुळी ता. कुडाळ येथे जावून खाजगी वाहनाने बातमीप्रमाणे वाहन अल्टो कार क्र. एम.एम/एच-२२०७ हे थांबवून तपासणी केली असता. सदर वाहनामध्ये गोवा बनावटी दारुचे एकूण ३३ बॉक्स जप्त करण्यात आले. सदर मिळून आलेले ३३ बॉक्स व अल्टो कार क्र. एम.एम/एच-२२०७ असा एकूण रु २,८२,४००/- किंमतीचा मुद्येमाल दास्वंदी गुन्हयांतर्गत जप्त करुन ताब्यात घेण्यात आला.

सदर वाहनचालक बस्त्याव सायमन गोन्स्लावीस (वय २२ वर्षे, रा. मु.पो. होडावडा ख्रिश्चनवाडी, घर नं. ७७ ता. वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग) यांना या कारवाई दरम्यान ताब्यात घेण्यात आले आहे. सदरील कारवाई मा. अधीक्षक श्री. मनोज शेवरे यांच्या मागदर्शनाखाली श्री. मिलींद गरुड, निरीक्षक, व श्री. उदय थोरात दुय्यम निरीक्षक यांनी कारवाई केली. सदर कारवाईमध्ये श्री. मिलींद गरुड, निरीक्षक, व श्री. उदय थोरात दुय्यम निरीक्षक, सौ. अर्चना वंजारी, दुय्यम निरीक्षक, श्री. सुरज चौधरी सहाय्यक दुय्यम निरीक्षक, श्री. वैभव कोळेकर, श्री. प्रसाद खटाटे व श्री. साईनाथ मेहकर व श्री. संदिप कदम वाहनचालक जवान व मदतनीस सर्व श्री. अवधूत सावंत, श्री. विजय राऊळ व प्रशांत परब यांनी मदत केली.

पुढील तपास श्री. उदय थोरात दुय्यम निरीक्षक करीत आहेत.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles