सावंतवाडी : ‘एक पेड माँ के नाम’ या अभियांतर्गत मिलाग्रीस प्रशालेमध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांना तब्बल 1000 लागवडीयोग्य वृक्षांचे वाटप करण्यात आले. यात खैर, सप्तरंगी, बेल इत्यादी रोपांचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. सामाजिक वनीकरण विभाग आजरा, जिल्हा कोल्हापूर यांचे याकामी विशेष सहकार्य लाभले. तब्बल 1000 रोप वाटप केलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या आईसोबत वृक्ष लागवड करतानाचा फोटो काढण्यासाठी प्रशालेतर्फे आवाहन करण्यात आले.’इको क्लब फॉर मिशन लाईफ’ या पोर्टलवर हे फोटो अपलोड करण्यात आले.या भव्य दिव्य उपक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालडाना व पर्यवेक्षिका श्रीम. संध्या मुणगेकर आणि प्रशालेच्या हरित सेना विभागाने विशेष मेहनत घेतली.
‘एक पेड माँ के नाम’ अभियांतर्गत मिलाग्रीस प्रशालेत विद्यार्थ्यांना तब्बल १ हजार रोपांचे वाटप.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


