Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

चालत्या रुग्णवाहिकेतून रस्त्यावर फेकला मृतदेह! ; नेमकं काय झालं?, पोलिसांनी खरं काय ते सांगितलं.

गोंडा : उत्तर प्रदेशच्या गोंडातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कारण व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर संताप होणार हे स्पष्ट आहे. एका 24 वर्षीय मुलाच्या मृत्यूत्या घटनेनंतर ग्रामस्थ आणि कुटुंबियांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. ग्रामीण लखनौ-गोंडा मार्गावर आंदोलन करत होते. या दरम्यान एक वेगवान रुग्णवाहिकेतून कोणीतरी मृतदेह स्ट्रेचरसहीत खाली टाकला. ही घटना गोंडा देहात कोतवाली भागातील बालपूर जाट गावातील आहे. मृत व्यक्तीचं नाव हृदय लाल असं सांगितलं जात आहे. पोलिसांच्या मते 1 ऑगस्टला पैशांवरून वाद झाला होता. त्यात हे प्रकरण मारहाणीपर्यंत गेलं. त्यात सदर तरूण गंभीर जखमी झाला होता आणि उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. मंगळवारी त्याने रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. तरूणाच्या मृत्यूची बातमी गावात पसरली आणि संतापाची लाट उसळली.

ग्रामस्थ आणि कुटुंबिय लखनौ गोंडा मार्गावर उतरले आणि आक्रमक झाले. यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान एक रुग्णवाहिका मृतदेह घेऊन जात होती. या रुग्णवाहिकेच्या गेटवर एक व्यक्ती लटकला होता. त्याने हृदय लालचं शव मृतदेहासह रस्त्यावर टाकला. यानंतर रुग्णवाहिकेने तेथून पळ काढला. ही संपूर्ण घटका कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे. तसेच सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाली. मृतदेह रस्त्यावर पडलेला पाहून कुटुंबिय आणि ग्रामस्थ स्तब्ध झाले. महिलांनी मृतदेहाजवळ धाव घेतली आणि हंबरडा फोडला. पोलिसांनी कशीबशी परिस्थिती नियंत्रणात आणली. मृतदेह एका ट्रकमधून अंत्यसंस्कारासाठी पाठवला.

पोलिसांनी नेमकं काय सांगितलं –

सीओ सीटीने सांगितलं की, या मारहाणीतील चार आरोपींना ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणाचा तपास केला जात आहे. दोषींविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. मृतदेह रुग्णवाहिकेतून पडल्याचा तपास केला असता प्रथमदर्शनी अशी माहिती मिळाली की, कुटुंबियांनी तो मृतदेह रुग्णवाहिकेतून खाली उतरवला होता. कुटुंबियांनी काही जणांची माथी भडकवली होती. त्यांचा हेतू शव रस्त्यावर ठेवू आंदोलन करण्याचा होता.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles