सावंतवाडी : येथील ज्येष्ठ नागरिक संघ इमारतीमध्ये दिव्यांग विकास केंद्र चालू आहे. ज्येष्ठ नागरिक सुविधा केंद्राच्या बांधकामावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी दिव्यांग विकास केंद्र समाज मंदिराच्या बाजूच्या इमारतीमधील एका खोलीत शिफ्ट केले. त्यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अत्यावश्यक साहित्य सोबत नेले. परंतु जागेअभावी उर्वरित साहित्य ज्येष्ठ नागरिक संघाच्या एका इमारतीमध्ये सुरक्षित ठेवले होते.

ज्येष्ठ नागरिक सुविधा केंद्रातील दिव्यांग विकास केंद्राच्या दोन खोल्यापैकी एका खोलीला सोमवार दिनांक 4 सप्टेंबर 2025 रोजी रात्री शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीचे शैक्षणिक व फिजिओ थेरपीचे देणगी स्वरूपात मिळालेले साहित्य आगीच्या बक्षस्थानी पडले. यात हजारो रुपयांचे साहित्य जाळून खाक झाले आहे. सामाजिक क्षेत्रात काम करणारे दाते, दानशूर व्यक्तींनी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पुढाकार घेऊन मदत करावी, अशी अपेक्षा यावेळी दिव्यांग विकास केंद्रच्या संचालिका सौ. रूपाली पाटील यांनी व्यक्त केली.


