सावंतवाडी : सेवानिवृत्त बौद्ध अधिकारी कर्मचारी संस्थेचे संस्थापक तथा आंबेडकर चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्ते व सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी सुरेश सखाराम कदम (वय ६८) यांचे १५ ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने कणकवली येथील एका खाजगी रुग्णालयात दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सून, नातवंडे, दोन भाऊ तीन बहिणी असा मोठा परिवार आहे. कै. कदम यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेतल्यानंतर आपल्या नोकरीची सुरुवात तत्कालीन रत्नागिरी जिल्ह्यात महसूल खात्यात लिपिक पदावरून केली होती. मात्र महसूल खात्याच्या परीक्षा देत त्यांनी उपजिल्हाधिकारी पदापर्यंत मजल मारली.
त्यांनी कणकवली, वेंगुर्ला, मालवण, राजापूर येथे नोकरी करीत सेवानिवृत्त सकाळ विदर्भात भंडारा येथे पूर्ण केला. अत्यंत अभ्यासू गोरगरिबांबद्दल कणव व शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांचा लौकिक होत. सेवा निवृत्तीनंतर जिल्ह्यात स्थापन झालेल्या सेवानिवृत्त बौद्ध अधिकारी कर्मचारी संस्थेच्या स्थापनेतही त्यांचा सिंहाचा वाटा होता. सध्या ते कणकवली येथे स्थायिक झाले होते. आज त्यांच्या मूळ गावी शिरवली तालुका देवगड येथे सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आला.


