मुंबई : “विश्वासाचा हात पाठीवर असेल तर पराभवाची भीती नसते…” या विश्वासाला साजेसा निर्णय आज भाजपमध्ये घेण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे युवा नेते विशाल परब यांच्या निलंबनामुळे जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते. अनेक कार्यकर्त्यांची इच्छा होती की परब यांनी पुन्हा पक्षामध्ये सक्रिय व्हावे.
यासाठी मार्गदर्शक मित्रवर्य अॅड. अनिल निरवडेकर यांनी सातत्याने पुढाकार घेत प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्रजी चव्हाण यांची भेट घेतली आणि कार्यकर्त्यांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या.
आज अखेर त्या प्रयत्नांना यश आले. प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांनी स्वतः अधिकृत घोषणा करून विशाल परब यांचे निलंबन मागे घेतले आणि त्यांना पुन्हा एकदा भाजप परिवारामध्ये सक्रिय करून घेतले.
या निर्णयाचे कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले असून, संपूर्ण कोकणात भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.


