सावंतवाडी : पर्यावरण संवर्धन तसेच प्लास्टिक मुक्तीचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शाळा आंबेगाव नं-१ च्या विद्यार्थ्यांनी श्रम संस्कार तसेच स्व कमाईचे धडे गिरवर गणेशोत्सवाचे औचित्य साधून आकर्षक पर्यावरण पूरक हारांची निर्मिती केली.शाळेच्या स्काऊट गाईड पथकाच्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी स्व निर्मितीचा आनंद घेत शाळेसाठी भरीव असा बावीस हजाराचा शैक्षणिक उठाव उभा केला. शाळेच्या उपक्रमशील पदवीधर शिक्षिका श्रीम. रसिका नाईक मॅडम यांच्या संकल्पनेतून व मुख्याध्यापिका श्रीम. अस्मिता मुननकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच श्रीम. स्नेहल कांबळे, स्काऊट मास्टर श्री. प्रदीपकुमार म्हाडगुत, स्काऊट मास्टर श्री. नितीन सावंत यांनी हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यास सर्वतोपरी सहकार्य केले. प्रदूषण मुक्तीचा संदेश देत हा अनोखा उपक्रम राबविल्याबद्दल शाळेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

या अंतर्गत शाळेने राबविलेल्या हारांच्या भव्य प्रदर्शन व विक्री उपक्रमास उदंड प्रतिसाद लाभला .या प्रदर्शनाचे उदघाटन शाळा व्यवस्थान समिती अध्यक्ष श्रीम.तेजस्वी गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी आंबेगावचे उपसरपंच श्री.रमेश गावडे,माजी अध्यक्ष श्रीम.साक्षी राऊळ,शिक्षण तज्ज्ञ श्री.राहुल राणे, श्रीम. रेखा गावडे,श्री.शिवराम मुळीक,श्री.रुपेश जाधव,श्री.उत्तम बहादुर, श्री. रामदास जंगले,श्री. प्रमोद परब, श्रीम.सान्वी परब,माजी मुख्याध्यापिका श्रीम. एकता सावंत उपस्थित होत्या.
या उपक्रमाला सरपंच श्री.शिवाजी परब,केंद्र प्रमुख श्रीम.भावना गावडे मॅडम यांनी शुभेच्छा देऊन कौतुक केले.


