Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

११ तोळे सोनं घातलं, लग्नात ३५ लाख खर्च, बी.टेक इंजिनिअर! ; बिचार्‍या प्रेग्नेंट शिल्पासाोबत ‘त्या’ घरात काय घडलं?

बंगळुरु : एका विवाहित महिलेने स्वत:चं जीवन संपवलं. मृत महिलेची ओळख पटली आहे. तिचं नाव शिल्पा आहे. ती इंजिनिअर होती. तीन वर्षांपूर्वी शिल्पाच प्रवीण नावाच्या युवकासोबत लग्न झालं होतं. तिला एक मुलं होतं. जीवन संपवलं, त्यावेळी शिल्पा गर्भवती होती. मात्र, तरीही तिने जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. मृत शिल्पाच्या कुटुंबियांनी नवऱ्यावर म्हणजे प्रवीणवर तिच्या हत्येचा आरोप केला आहे. ते ही आत्महत्या असल्याच भासवत आहेत, असं शिल्पाच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे. कर्नाटक बंगळुरुच्या सुद्दागुंटेपल्या पोलीस स्टेशन हद्दीतील हे प्रकरण आहे.

शिल्पाने बी. टेकमधून इंजिनियरिंग केली होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी तिचं लग्न प्रवीणसोबत लावून दिलं. तो एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरीला होता. शिल्पाच्या आई-वडिलांनी लग्नात 13 तोळे सोनं आणि 35 लाख रुपये खर्च केले होते. पण प्रवीणची पैशाची भूक शांतच होत नव्हती. लग्नानंतरही तो त्यांना पैशांसाठी त्रास देत होता.

त्यांना मुलगी सोफ्यावर मृतावस्थेत दिसली –

यानंतर शिल्पाने सॉफ्टवेअरची नोकरी सोडली. आई-वडिलांकडून 5 लाख रुपये घेतले व पाणीपुरीचा बिझनेस सुरु केला. शिल्पाने स्वत:च जीवन संपवल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. शिल्पाच्या आई-वडिलांनी सांगितलं की, शिल्पाचा नवरा प्रवीणचा दोन दिवसांपूर्वी फोन आलेला. त्याने सांगितलं की, तुमच्या मुलीला ह्दयविकाराचा झटका आलाय. लवकर निघून या. शिल्पाचे आई-वडिल आले, त्यावेळी त्यांना मुलगी सोफ्यावर मृतावस्थेत दिसली. त्याचं म्हणणं आहे की, त्यांच्या मुलीने आत्महत्या केलेली नाही. प्रवीणने तिची हत्या केली व आत्महत्या सांगत आहे.

नवऱ्याला ताब्यात घेऊन चौकशी –

शिल्पाची आई शारदा म्हणाली की, “माझ्या मुलीला रोज त्रास दिला जात होता. आम्ही त्याला 10 लाख रुपये दिले. पण त्रास थांबला नाही. माझ्या मुलीचा मृत्यू झालाय, मला न्याय हवा आहे” जावई प्रवीण मागच्या तीन महिन्यांपासून आमच्याशी बोलतही नव्हता, असं त्यांनी सांगितलं. आई-वडिलांची तक्रार पोलिसांनी नोंदवून घेतली आहे. आरोपी प्रवीणला ताब्यात घेऊन चौकशी सुरु आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles