Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

लव्ह मॅरेजचा भयाकन अंत, पतीनेच मुस्कानचं शिर धडावेगळं केलं! ; पोलीस तपासात गूढ उलगडलं.

कल्याण : भिवंडी शहरातील खाडी लगतच्या ईदगाह झोपडपट्टीजवळील दलदलीत 30 ऑगस्ट रोजी महिलेचं धडावेगळं शिर आढळून आल्यानंतर या महिलेची हत्या केलेल्या गुन्ह्याचा उलगडा करण्यात स्थानिक भोईवाडा पोलिसांना यश मिळाले आहे. पोलिसांनी अवघ्या 24 तासात हत्या झालेल्या महिलेची ओळख पटवून 48 तासात हत्या करणाऱ्या आरोपी पतीस अटक केली. परवीन उर्फ मुस्कान (वय 26) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून या गुन्ह्यात पती तहा इम्तियाज अन्सारी याला अटक केली आहे. ईदगाह झोपडपट्टी जवळील खाडी लगतच्या दलदलीत 30 ऑगस्ट रोजी धडा वेगळे महिलेचे शिर आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. तर महिलेची ओळख पटवणे व त्यानंतर हत्येचा आरोपी पकडण्याचे मोठे आव्हान भोईवाडा पोलिसांसमोर होते.

भोईवाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांसह वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रमोद कुंभार व त्यांच्या पोलिस पथकातील पोलिसांनी ईदगाह झोपडपट्टीत माहिती घेण्यास सुरवात केली. त्यामध्ये येथील एक महिला दिसत नसल्याबद्दल माहिती समोर आली.त्यामुळे पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित करीत चौकशीस सुरवात केली. त्यामध्ये परवीन उर्फ मुस्कान या महिलेचा तो मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर माहिती घेतली असता तिचा चालक पती घरी नसल्याचे आढळून आले. पोलिसांनी शोध घेत त्यास 1 सप्टेंबर रोजी सायंकाळी पतीला ताब्यात घेऊन कसून चौकशी सुरू केली. त्यानंतर पती तहा याने पत्नीच्या हत्येची कबुली दिली. पोलिसांनी त्यास घटनास्थळी नेऊन हत्या केलेल्या पत्नीचे धड कोठे आहे, त्याबाबत शोध घेण्यासाठी खाडी पात्रात बोटीच्या सहाय्याने शोध घेण्याचा प्रयत्न केला.

दोन वर्षांपूर्वी तहा अन्सारी व मुस्कान अन्सारी यांनी प्रेमविवाह केला होता, त्यांना एक वर्षाचा मुलगा देखील आहे. ज्याचं नाव मोहम्मद अजलान अंसारी आहे. तहा अन्सारी व मुस्कान अन्सारी यांच्यामधील असलेल्या प्रेमात मिठाचा खडा पडला. दोघेही एकमेकांवर चारित्र्यावरुन संशय घेत होते आणि त्यामध्ये त्यांच्यात भांडण देखील होत होतं. हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू होता. शिवाय मुस्कान अन्सारी ही इंस्टाग्रामवर रील बनवत, त्यासाठी तिला काही मुलंही भेटत होती. परंतु, त्यामुळे त्यांच्यात आणखी भांडण होत असून त्यांच्यात हाणामारी सुद्धा होत असे. त्यातून परवीन ही 28 ऑगस्ट रोजी रिल्स बनवण्यासाठी घरातून निघून गेली होती, त्यातून वाद झाला. तर दुसरीकडे परविन आपल्या मुलाला देखील मारहाण करत होती या सगळ्या गोष्टीवरून दोघांमध्ये खूप भांडण व हाणामारी होत होती आणि याच भांडणातून अखेर पती तहा इम्तियाज अन्सारी याने 29 ऑगस्ट रोजी पत्नी परवीन हिची क्रूरपणे हत्या केली.

पत्नीचे शिर धडापासून वेगळे करीत आरोपी पतीने शरीराचे दोन तुकडे करीत ते खाडीत भरतीचे पाणी वाढले असताना त्यात फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आता घटनास्थळी स्थानिक पोलिसांसह फॉरेन्सिक पथक व श्वान पथकास पाचारण करून शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पण अजूनही धड आढळून न आल्याने खाडी लगतच्या पोलिस शोध घेत आहेत. दरम्यान, आरोपी पती तहा इम्तियाज अन्सारी या भिवंडी न्यायालयात हजर केले असता त्यास 11 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

चिमुकला झाला पोरका –

दरम्यान, या घटने एक वर्षाचा मोहम्मद अजलानची काय चूक होती. बापाकडून आईची हत्या या एक वर्षाच्या मोहम्मद अजलानच्या समोरच झाली . प्रेमविवाह केलेल्या या जोडप्याच भयानक अंत पाहायला मिळाला. मात्र, यामध्ये आई गमावली आणि बाप जेलमध्ये गेल्याने मुलगा आता एकटा पडला आहे, सध्या या मुलाला नातेवाईकांनी आपल्यासोबत घेत त्याचा सांभाळ सुरू केलाय. चिमुकल्या मोहम्मदला पाहून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles