मुंबई : मुंबईतील सर्वात मोठं जंक्शन असलेल्या दादरमध्ये रेल्वे स्टेशनमधील फलाट क्रमांक 14 जवळील दुचाकीच्या पार्किंगमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. फलाट क्रमांक 14 बाहेरील पार्किंग स्टँडमध्ये उभ्या असलेल्या एका दुचाकीला आग लागली. त्यानंतर ही आग भडकत गेल्याने आगीत 10 ते 12 दुचाकी जळाल्यांची सूत्रांची माहिती आहे.

पार्किंगमधील गाडयांना आग नेमकी कशी लागली हे अद्याप अस्पष्ट आहे, मात्र आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमक दल दाखल झाले होते.

अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवल्याचं पाहायला मिळालं, वेळीच नियंत्रण मिळाल्याने मोठा अनर्थ टळला. आगीच्या दुर्घटनेत सुदैवाने कुठलीही जिवतहानी झाली नसून 10 ते 12 गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे, या घटनेचा तपास सुरू आहे.


