सावंतवाडी : महामार्गावरील खड्डे दुरुस्ती व पुलावरील लाईट सुरू होण्यासंदर्भात आज ४ सप्टेंबर रोजी शाम धुरी यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनास मनसे तालुका अध्यक्ष मिलिंद सावंत व सर्व बांदा मनसे कार्यकर्त्यांचा या आंदोलनास पूर्ण पाठिंबा दर्शविला आहे. काही दिवसांपूर्वी बांदा शहरात रात्रौच्यावेळी दुकान फोडण्यात चोरटे यशस्वी झाले होते.
मनसे तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत यांनी निवेदनाद्वारे संबंधित खात्याला उड्डाण पुलावरील लाईट लवकरात लवकर चालू व्हावी यासाठी सांगितले होते. तरीही अद्यापपर्यंत उड्डाण पुलावरील लाईट सुरू झाली नाही. त्यामुळे यासाठी मनसे तालुका अध्यक्ष मिलिंद सावंत यांनी स्वतः आपल्या कार्यकर्त्यांसमवेत सदर आंदोलनास पाठिंबा दर्शविला आहे.


