ओरोस : राष्ट्रनेता लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरावड्याचे आयोजन देशभरात करण्यात येत आहे. भाजप सिंधुदुर्गकडून ‘सेवा पंधरावड्याचे आयोजन’ 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरावड्याचे आयोजन देशभरात करण्यात येत आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी
‘सेवा परमोधर्म!’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या विचारांना पुढे नेत काही सेवाभावी उपक्रम साजरे करत आहेत.
स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, दिव्यांगाचा सन्मान, विकसित भारत चित्रकला स्पर्धा, पंतप्रधान नरेंद्र मोदींजींच्या जिवनावर प्रदर्शनी, प्रबुद्ध संमेलन,दिन दयाळ जयंती- २५ सप्टेंबर आणि महात्मा गांधी जयंती- २ ऑक्टोबर अशा पद्धतीने सेवाभावी अशा सामाजिक उपक्रमांद्वारे खासदार मा नारायणराव राणे, पालकमंत्री नितेशजी राणे व जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या मार्गदर्शनात साजरा करण्यात येणार आहे.
भाजपा किसान मोर्चा कडून “एक पेड मा के नाम” हे विशेष अभियान राबवण्यात येईल
यानिमित्त भाजपा पदाधिकाऱ्यांसाठी गुरूवार दिनांक ११ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वा जिल्हा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व च्या सर्व 14 मंडळांमध्ये सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात येणार आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात विश्वगुरू निर्माण होणारा सेवाभावी आत्मनिर्भर भारत आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याच स्वदेशी मूल्यांवर ठाम राहिलेला भारत आज अमेरिकेलाही टक्कर देऊ पाहतोय. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात वरील सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे या कार्यक्रमाचे जिल्हा संयोजक प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांच्या नेतृत्वात सर्व सेवाभावी कार्यक्रम होतील. सह संयोजक म्हणून विजय केनवडेकर, प्राची इस्वलकर, आणि सोशल मीडिया प्रतिनिधी म्हणून श्रीकृष्ण परब यांची निवड करण्यात आली आहे.
या अभियान दरम्यान जिल्ह्याचे सुपुत्र भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा दिनांक २० सप्टेंबर रोजी येणारा वाढदिवस सुद्धा विविध सेवा उपक्रमांनी साजरा केला जाणार आहे
सिंधुदुर्ग जिल्हा भाजपकडून ‘सेवा पंधरावडा’चे आयोजन! ; जिल्हा संयोजक पदी प्रसन्ना देसाई यांची निवड.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


