सावंतवाडी : शहरातील कळसुलकर इंग्लिश स्कूल शेजारील जिमसमोर उभ्या केलेल्या पाच दुचाकींना मालवाहू टेम्पने ठोकर दिली. यात पाचही दुचाकींच नुकसान झालं. बराच वेळ होऊन देखील पोलिस घटनास्थळी दाखल नव्हते त्यामुळे वातावरण तंग झाले होते.

मच्छि मार्केट रोड येथे ही घटना घडली. यात एका मालवाहू टेम्पो न पाच दुचाकींना ठोकर दिली. यात त्या गाड्यांच मोठं नुकसान झालं. टेम्पो चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप नुकसानग्रस्त दुचाकी मालकांनी केला आहे. यामुळे वातावरण देखील तंग झाले होते. बराचवेळ पोलीस दाखल न झाल्यानं वादही चिघळला होता. अखेर पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी हा वाद शांत करत पुढील सोपस्कार पार पाडले. यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.
सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, पोलीस उपनिरीक्षक सरदार पाटील, पोलीस हवालदार मंगेश शिंगाडे, संभाजी पाटील, मयूर निरवडेकर आदी पोलीस घटनास्थळी उपस्थित होते.


