Saturday, November 8, 2025

Buy now

spot_img

महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशनच्या धुळे जिल्हाध्यक्ष पदी ॲड. अमित दुसाने यांची नियुक्ती.

धुळे : सामाजिक, शैक्षणीक, राजकीय, सहकार, धार्मिक, कायद्याचा क्षेत्रात सक्रीय आणि नेहमीच उल्लेखनीय कार्य करणारे ॲड. अमित दुसाने यांची नुकतीच महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशनच्या वतीने नुकतीच धुळे जिल्ह्याच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

सदर नियुक्ती महाराष्ट्र ॲण्ड गोवा नोटरी असोसिएशन राज्याचे पदाधिकारी . ॲड. यशंवतराव खराडे (कार्या.अध्यक्ष) ॲड. प्रविण एच .नलावडे (सचिव) ॲड. सैय्यद सिंकदर अली‌ ( अध्यक्ष) यांनी केली आहे.

ॲड. अमित दुसाने हे विद्यार्थी दशेपासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे पासुन सार्वजनिक जीवानात सक्रीय आहेत .डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयात शिक्षण घेत असतांना त्यांची विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव नियुक्ती झाली होती. ते विद्यापीठाचे स्टुंडट कौन्सीलचे प्रतिनिधी होते. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य म्हणून पदवीधर मतदारसंघातून निवडून आले होते. विद्यार्थीच्या न्याय हक्कासाठी महत्वाची भुमिका बजावली होती . सुवर्णकार समाजाचे ते कायदेशीर सल्लागार म्हणून कार्यरत आहेत . भाजपाच्या अनेक संघटनात्मक पातळीवर विविध सक्रीय पणे जबाबदारी पार पाडल्या आहेत*.

भाजपा जिल्हा प्रवक्ते , युवा मोर्चाच्या जिल्हा अध्यक्ष, महानगर सरचिटणीस, महानगर जिल्हा संघटन सरचिटणीस, महानगर उपाध्यक्ष म्हणून कार्य केले आहेत. धुळे जिल्हा वकील संघाचे कार्यकारणी सदस्य , सचिव म्हणून निवडुन आलेले होते. बेरोजगार युवक फेडरेशनचे सचिव,महिला व बाल कल्याण विभागाच्या अंतर्गत बाल कल्याण समितीचे अध्यक्ष म्हणून देखील काम केले आहे, बॅच ऑफ मॉजिस्टेट म्हणून त्यांना दर्जा होता.

धुळे जिल्ह्यातील नोटरी वकीलांचे संघटन उभे करावयाचे असुन नोटरी वकील यांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्व वकील बांधवानी एकत्र यावे कारण नसतांना नोटरी वकील बांधवा वर चुकीचे व खोटे दस्तावेज नोंदविले म्हणून खोटया स्वरूपाचे गुन्हे दाखल होत आहेत ही बाब चिंताजनक आहे. या विषयावर नोटरी वकील बांधवांनी एकत्र येवून भुमिका घ्यावी वकील संरक्षण कायदा होण्यासाठी पाठ पुरावा करण्याची गरज आहे असे मनोगत व्यक्त करताना नवनियुक्त जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ विधीतज्ञ श्री. अमित दुसाने बोलत होते.

जिल्हा वकील संघ, सामाजिक, राजकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून ज्येष्ठ विधीतज्ञ श्री. अमित दुसाने यांच्यावर अभिनंदननाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles