- फिरत्या डिजिटल दवाखान्याद्वारे वाड्यावस्तीतील सामान्य जनतेला आरोग्यविषयक आधुनिक सुविधा करून दिल्या उपलब्ध.
सावंतवाडी : देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी देशभरात सर्वत्र सेवा- सुशासन पंधरवडा साजरा करत आहे. भारतीय जनता पार्टीचे युवा नेते विशाल परब यांनीही महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या सेवा पंधरावड्यात विविध सेवाभावी उपक्रमांचे नियोजन केलेले आहे.

कोकणातील जनतेच्या आरोग्य विषयक समस्यांबाबत अनेक स्तरावर सातत्याने चर्चा होत असते. परंतु या चर्चेच्या पलीकडे जात भाजपा नेते युवा उद्योजक विशाल परब यांनी एक आगळावेगळा कार्यक्रम सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात आयोजित केला आहे. इथल्या जनतेसाठी श्री विशाल परब यांच्या वतीने फिरता डिजिटल दवाखाना सुरू करण्यात आला आहे.

या उपक्रमाद्वारे ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांची आरोग्य विषयक तपासणी व्हावी आणि त्यांना तात्काळ व मोफत आरोग्य सेवा मिळावी हा उद्देश आहे. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित या फिरत्या दवाखान्यात १०० पेक्षा जास्त तपासण्या करण्यात येत आहेत. आरोग्य तपासणीनंतर पाच ते दहा मिनिटात तपासणी रिपोर्ट मिळतील. संपूर्ण शरीर तपासणी, हिमोग्लोबिन कोलेस्टॉरेल, शरीर तापमान, रक्तदाब, हृदय तपासणी, इसीजी, युरीन टेस्ट, ऑक्सीजन पातळी आदी विविध टेस्ट या तपासणी दरम्यान केल्या जाणार आहेत. जनतेच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या या सेवाभावी उपक्रमाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात कौतुकाने केली जात आहे.
या उपक्रमाचे उद्घाटन करताना विशाल परब म्हणाले की, प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाणसाहेब यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाने माझी ही संकल्पना साकारली जाते याचे मला समाधान वाटते. जनतेच्या आरोग्याच्या प्रश्नांसाठी मी काम सुरू केले असून प्रत्येक नागरिकाचे स्वास्थ्य सुरक्षित राहावे यासाठी भविष्यात गोरगरीब जनतेला परवडेल असे अद्ययावत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतवाडीत उभे करणे हे माझे ध्येय आहे. आजचा उपक्रम हा त्यादिशेने वाटचाल करणारा संकल्प आहे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, तसेच वरिष्ठ भाजपा नेत्यांच्या मार्गदर्शनातून लवकरच मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभे केले जाईल.
या डिजिटल फिरत्या दवाखान्यामुळे गावागावातील नागरिकांना घरच्या घरी आधुनिक तपासणी उपचार उपलब्ध मिळतील, तसेच आरोग्याबद्दल जनजागृती होऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांना चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. भाजपा नेते युवा उद्योजक श्री विशाल परब यांच्या या आगळ्यावेगळ्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या हिताच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी भाजपा नेते विशाल परब यांच्या समवेत ॲड.अनिल निरवडेकर, बांदा मंडल अध्यक्ष स्वागत नाटेकर, उपाध्यक्ष गुरुदत्त कल्याणकर, शक्ती केंद्र प्रमुख जयेश सावंत, सरपंच श्री संजय डिंगणेकर, उपसरपंच शैलजा नाडकर्णी, श्री रंगनाथ गवस, आदेश सावंत, संजय नाईक, अमेय पै, सौ गीता सावंत, सौ आरोही गवस, बुथ अध्यक्ष श्री राजन सावंत, माजी सरपंच श्री नाना सावंत, महादेव सावंत, आनंद सावंत, फटू सावंत नितीन राऊळ, केतन आजगावकर आदी मान्यवर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


