सावंतवाडी : क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे व सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा कार्यालय ओरोस तसेच उपरकर शूटिंग अकॅडमी वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय नेमबाजी स्पर्धा उपरकर शूटिंग अकॅडमी येथे घेण्यात आली.
या स्पर्धेत महात्मा गांधी विद्या मंदिर हायस्कूल, सातार्डा प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलं.
या स्पर्धेत १० मीटर ओपन साईट रायफल (१४ वर्षाखालील मुलगे) –
व्दितीय – स्वयम नितेश कवठणकर तृतीय – सौरभ श्रीधर पेडणेकर.
( १४ वर्षाखालील मुली )
व्दितीय – खुशी प्रशांत सातार्डेकर –
(१७ वर्षाखालील मुलगे ) व्दितीय गौरांग कृष्णा सातार्डेकर.
(१४ वर्षाखालील मुली)
प्रथम – मनस्वी सोनु आरोलकर.
तृतीय – यशिका सुधाकर वेंगुर्लेकर
( १९ वर्षाखालील मुलगे)- तृतीय – रामचंद्र विक्रांत मांजरेकर –
(१९ वर्षाखालील मुली) – तृतीय – हेतल श्रीधर पेडणेकर
(१० मीटर पिस्तल)
१७ वर्षाखालील मुलगे )-
तृतीय – ओंकार शेखर मेस्त्री –
(१७ वर्षाखालील मुली) – व्दितीय – संजना गणेश घाडी.
(१९ वर्षाखालील मुलगे )-
व्दितीय – रामचंद्र हरेश पार्सेकर.
(१९ वर्षाखालील मुली) –
व्दितीय – समृध्दी संदिप सातार्डेकर.
या सर्वांची कोल्हापूर विभाग स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सर्व खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षक प्रशालेचे मुख्याध्यापक प्रशांत सावंत यांचे सातार्डा मध्यवर्ती संघ मुंबई पदाधिकारी, शाळा समिती पदाधिकारी, ग्रामस्थ,पालक,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी यांनी अभिनंदन केले तसेच पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.


