सावंतवाडी : महात्मा गांधी विद्या मंदिर हायस्कूल, सातार्डा प्रशालेला मिलन दिपक सातोस्कर, कु. सायली दिपक सातोस्कर व कु. मिलनचे (मामा) गोविंद ओक यांनी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेसाठी सर्व विद्यार्थ्यांना आवश्यक स्टीलची (१२०)ताटे देणगी स्वरूपात दिली.
यासाठी सातोसे गावचे पोलीस पाटील संदिप सातार्डेकर व सामाजिक कार्यकर्ते प्रसाद मांजरेकर यांनी विशेष प्रयत्न केले.
वरील साहित्य प्रशाळेचे मुख्याध्यापक प्रशांत सावंत ,पोषण आहार विभाग प्रमुख शिक्षक गणेश कुंदे व शाळा समिती सदस्य अमेय सातार्डेकर यांच्याकडून प्रदान करण्यात आले.
यावेळी सातोस्कर कुटुंबातील सदस्य, संदिप सातार्डेकर व प्रसाद मांजरेकर यांचे शाळा समिती, सातार्डे मध्यवर्ती संघ मुंबई, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी आभार मानले.


