सावंतवाडी : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व जिजाऊ या सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून कोकणातील पाचही जिल्ह्यांमध्ये विविध क्षेत्रात समाजातील सर्व घटकांसाठी गेली तब्बल वीस वर्ष काम करणारे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या माध्यमातून कोकणातील पाचही जिल्ह्यांमध्ये विविध स्पर्धा परीक्षांसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्याना मार्गदर्शन व्हावे, तसेच त्यांना मोफत वाचनालयाची सोय उपलब्ध व्हावी म्हणून पन्नासहून जास्त मोफत वाचनालय सुरू केलेली आहेत. सावंतवाडीत माठेवाडा येथे जिजाऊच्या माध्यमातून गेल्या सहा वर्षापासून वाचनालय सुरू असून सावंतवाडीत तालुक्यातील स्पर्धापरीक्षांना बसणारे अनेक विद्यार्थी/विद्यार्थीनी यांचा लाभ घेत असून त्यापैकी काही जणांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळविले आहे.
तरी जिजाऊच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेल्या या मोफत शैक्षणिक सुविधेचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिजाऊ मोफत वाचनालयाचे समन्वयक ॲड. नकुल पार्सेकर यांनी केलेले असून अधिक माहितीसाठी या वाचनालयाच्या व्यवस्थापिका कु. मानसी म्हापसेकर 9579284907 शी संपर्क साधावा असे आवाहन ॲड. पार्सेकर यांनी केले आहे.


