सावंतवाडी : तालुक्यातील तळवडे आंबाडेवाडी येथील पूर्वीदेवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त २३ पासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार २३ रोजी सायंकाळी ७ ते १० वाजता भूतनाथ भजन मंडळ, निरवडे, ब्राह्मणदेव भजन मंडळ, तळवडे रात्री १० ते १२ वाजता थळकर दांडिया ग्रुप, तळवडे, त्रिमूर्ती दांडिया ग्रुप, वेंगुर्ला तांबळेश्वर भगवती दांडिया ग्रुप, वेंगुर्ला बुधवार २४ रोजी सायंकाळी ७ ते १० वाजता गावडेश्वर भजन मंडळ, आसोली पाटेकर भवानी भजन मंडळ, तळवडे श्री देवी सातेरी महिला फुगडी ग्रुप, अणसूर रात्री १० ते १२ वाजता उत्कर्ष दांडिया ग्रुप, वेंगुर्ला यंगस्टार दांडिया ग्रुप, तळवडे जय गणेश दांडिया ग्रुप, मळगाव गुरुवार २५ रोजी रात्री ८ वाजता वावळेश्वर दशावतार नाट्य मंडळ, तेंडोली यांचा ट्रीकसीनयुक्त नाट्यप्रयोग’ अयोध्याधीश श्रीराम ‘ शुक्रवार २६ रोजी रात्री ८ वाजता नितीन आसयेकर प्रस्तुत श्री देवी भूमिका दशावतार लोककला नाट्य मंडळ, मळगाव यांचा ट्रीकसीनयुक्त नाट्यप्रयोग ‘ बाळूमामा ‘शनिवार २७ रोजी रात्री ८ वाजता अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळ, म्हापण वेंगुर्ला यांचा ‘कुर्मदासाची वारी ‘ नाट्यप्रयोग रविवार २८ रोजी रात्री ८ वाजता डबलबारी भजनाचा सामना श्री लिंगरवळनाथ मंडळ, पोखरण कुडाळ बुवा – समिर कदम विरुद्ध श्री भूतेश्वर भजन मंडळ, खुडी देवगड बुवा- संतोष जोईल यांच्यात हा सामना होणार आहे. लाभ घेण्याचे आवाहन विकास राजाराम गावडे यांनी केले आहे.
तळवडे पुर्वीदेवी मंदिरात नवराञोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


