सावंतवाडी : क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आणि जिल्हा प्रशासन सिंधुदुर्ग यांच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय शालेय डॉजबॉल क्रीडा स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडीच्या 17 वर्षांखालील मुले व मुली या दोन्ही संघांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून आपल्या क्रीडा कौशल्याची चुणूक दाखवत विभागीय स्पर्धेसाठी आपले स्थान बळकट केले आहे.
या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले ,चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले,कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले , विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले व मंडळाचे संचालक श्री दिलीप देसाई , मंडळाचे सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, मंडळाचे सदस्य श्री जयप्रकाश सावंत ,डॉ.सतीश सावंत , जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती नीलिमा अडसूळ, मुख्याध्यापिका श्रीमती अनुजा साळगांवकर , क्रीडा शिक्षक श्री.भूषण परब तसेच प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,पालक शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


