सावंतवाडी : राष्ट्रीय स्तरावरील रायफल शूटिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून सावंतवाडीचे नाव उज्वल करणाऱ्या सार्जंट अनंत अनन्या अभिजीत चिंचकर याचा रोटरी क्लब सावंतवाडी तर्फे भव्य सत्कार करण्यात आला.
अनंत हा कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय. बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी तसेच ५८ महाराष्ट्र बटालियन एनसीसीचा अभिमान असून, अलीकडेच दिल्ली येथे लेफ्टनंट जनरल गुरप्रीत सिंग यांच्या हस्ते त्याने सुवर्णपदक स्वीकारले.
या सत्कार प्रसंगी रोटरी अध्यक्ष अॅड. सिद्धार्थ भांबुरे,सचिव सीताराम तेली,रोट्रॅक्ट अध्यक्ष सिद्धेश सावंत,रो. राजेश रेडिज,रो. सुभाष पुराणिक,रो. विनया बाड,रो. साई हवालदार,रो. सुबोध शेलटकर,रो. जिगजिनी,रो. काका परब,रो. भावेश भिसे, अनंत चिंचकर कुटुंबीय उपस्थित होते.
अनंतच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे सावंतवाडीत आनंदाचे वातावरण असून, त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.


