दुबई : बांगलादेश क्रिकेट टीमने आशिया कप 2025 स्पर्धेतील सुपर 4 फेरीत विजयी सलामी दिली आहे. बांगलादेशने दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात श्रीलंकेवर 4 विकेट्सने विजय मिळवला आहे. श्रीलंकेने बांगलादेशसमोर 169 धावांचं आव्हान ठेवलं होतं. बांगलादेशने हे आव्हान 1 बॉलआधी 6 विकेट्स गमावून पूर्ण केलं. बांगलादेशने या विजयासह श्रीलंकेने साखळी फेरीत केलेल्या पराभवाची अचूक परतफेड केली. श्रीलंकेने बांगलादेशला 13 सप्टेंबरला 6 विकेट्सने पराभूत केलं होतं. बांगलादेशने सुपर 4 मध्ये विजय मिळवून या पराभवाचा हिशोब बरोबर केला आहे. बांगलादेशच्या विजयात ओपनर सैफ हस्सन आणि तॉहिद हृदॉय या दोघांनी प्रमुख भूमिका बजावली. या दोघांनी अर्धशतकी खेळी केली. तर कॅप्टन लिटन दास आणि शमीन हौसेन या दोघांनीही योगदान दिलं. मात्र त्यानंतरही बांगलादेशला विजयासाठी शेवटच्या ओव्हरपर्यंत प्रतिक्षा करावी लागली.
बांगलादेशची बॅटिंग –


