सावंतवाडी : डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने २०२५– २६ ची पहिली जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेचा शुभारंभ काल शनिवार दिनांक २० सप्टेंबर रोजी सावंतवाडी जिमखाना येथे करण्यात आला. या स्पर्धेला खेळाडूंचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. भाजपा महाराष्ट्रचे युवा नेते विशाल परब यांच्या संकल्पनेतून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त या भव्यदिव्य स्पर्धेचे आयोजन भाजपा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले आहे.
आज या स्पर्धेला सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचे भारतीय जनता पार्टीच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी सावंतवाडी शहर भाजप मंडळ अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, माजी नगरसेवक आनंद नेवगी, माजी पंचायत समिती सभापती तथा जिल्हा बँक संचालक रवी मडगावकर, दिलीप भालेकर, सिंदुधुर्ग जिल्ह्याचे कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष अवदूत भगणे, सदस्य दिलीप वाडकर, सेक्रेटरी योगेश फणसळकर, सदस्य अनिल कमळकर यांसह अन्य उपस्थित होते.
दरम्यान १८ वर्षांखालील मुले व मुली आणि खुला गट अशा वयोगटांमध्ये या स्पर्धा घेण्यात येत आहेत. स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह, तसेच आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.


