सावंतवाडी : भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त तळवडे गावातील विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या वाटप सारखा एक सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.भारतीय जनता पार्टीचे नेते तथा माजी आंबोली मंडल अध्यक्ष संदिप गावडे यांच्या सहकार्याने व मिलिटरी रिटायर प्रवीण लोके तसेच सुधीर लोके यांच्या पुढाकाराने तळवडे गावातील जिल्हा परिषद शाळा नं. ९ मध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात बोलताना तळवडेचे माजी उपसरपंच बाळू साळगावकर यांनी शासनामार्फत राबविलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा ‘सुंदर शाळा अभियानात तळवडे शाळा नं.९ ने तालुकास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त करून तीन लाखाचे बक्षीस मिळवल्याबद्दल तसेच शासनाने राबवलेल्या जिल्हास्तरीय परसबाग स्पर्धेमध्ये देखील जिल्ह्यामध्ये तळवडे शाळा नं.९ याने प्रथम क्रमांक मिळवला त्याबद्दल शाळेच्या शिक्षकांचे व ग्रामस्थांचे अभिनंदन केले.सदर कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित माजी गाव अध्यक्ष बीजेपी रामभाऊ गावडे,बीजेपी बुथ अध्यक्ष सुशांत गावडे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेश मेस्री,मुख्याध्यापिका सौ.अनुराधा सावंत,शिक्षक दिंगबर तळणकर,नागेश कोंडावार,पंकज लोके,संजय आचरेकर,प्रसाद गावडे,रामदास मेस्री,शंकर लोके,शाम हरमलकर,बीजेपी कार्यकर्ते ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.


