वेंगुर्ला : तालुक्यातील शिरोडा वेळागर येथील युवती मालिनी मदन अमरे हीने पुणे पिंपरी चिंचवड येथे १४ सप्टेंबर २०२५ संपन्न झालेल्या कशिश प्रोडक्शन ‘मिस ग्लोबल इंडिया’ या सौंदर्य स्पर्धेत प्रथम उपविजेती पदावर नाव कोरले.
ही स्पर्धा आयोजक योगेश पवार यांच्या कशिश प्रोडक्शन यांनी आयोजित केली होती. या स्पर्धेत फायनल राऊंड मध्ये दमदार प्रदर्शन करत मालिनी अमरे हिने 1st Runner Up पद मिळवत कोंकणचा डंका बजावला आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरावरून तीचे अभिनंदन होत आहे.
या अगोदर तीने दि रॉयल पेजेंट मिस महाराष्ट्र २०२४ व महाराष्ट्राची सौंदर्यवती २०२४ ह्या स्पर्धामध्ये देखील आपला डंका बजावला आहे.


