गोंदिया : घरासमोर उभ्या असलेल्या पाच वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना अगदी ताजी असतानाच गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील धमदिटोला येथे वाघाच्या हल्ल्याची घटना घडलीय. झोपेत असलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
प्रभाबाई कोराम (49) असे वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. प्रभाबाई कोराम ही महिला आपल्या मुलीच्या गावी धमदिटोला येथे गेली होती. शनिवारी, ती घराच्या व्हरांड्यात झोपली असताना मध्यरात्री वाघाने त्या महिलेवर हल्ला केला. यातच त्या महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर वाघाने महिलेला ब्लँकेट आणि मच्छरदाणीसह फरफटत नेले.
गावकऱ्यांचा वनविभागाविरोधात संताप –
रविवारी सकाळी या घटनेची माहिती गावकऱ्यांना झाल्यानंतर गावकऱ्यांनी वनविभागावर चांगला रोष व्यक्त केला. मृतक महिलेच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली. वनविभागाच्या वतीने मृतक महिलेच्या कुटुंबीयांना एक लाख रुपयांची मदत करण्यात आली असून पुढील आठवड्याभरात पूर्ण मदत करू असे आश्वासन वनाधिकाऱ्यांनी दिले आहे.
बिबट्याचा चिमुकल्यावर हल्ला –
तीनच दिवसांपूर्वी, मोरगाव अर्जुनी तालुक्यातील संजयनगर या ठिकाणीही अशीच घटना घडली होती. घरासमोर उभ्या असलेल्या पाच वर्षांच्या चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केले होते. त्यानंतर लगेच वाघाच्या हल्ल्याची घटना घडली आहे. त्यामुळे वनविभागावर ग्रामस्थ नाराज असून त्यांच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त केला जात आहे. वडनेर गेट परिसरातील कारगिल गेटजवळ असलेल्या कार्टरमध्ये राहणाऱ्या कुटुंबातील दोन वर्षीय श्रुतिक गंगाधर सायंकाळी घराबाहेर खेळत होता. अचानक जवळच्याच झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने क्षणार्धात त्याच्यावर झडप घातली आणि जबड्यात परून जंगलाच्या दिशेने ओढत नेले. काही कळण्याच्या आत घडलेल्या या प्रकाराने मुलाच्या आईने हंबरडा फोडला. पण तोपर्यंत बिबट्या अंधारात पसार झाला होता.
चिमुकल्याचा शोध घेण्यासाठी आर्टिलरी सेंटरचे जंगल लष्कराचे जवान व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पिंजून काढले. सुमारे अडीचशे ते तीनशे अधिकारी, कर्मचारी मृत बालकाचा शोध घेत होते. त्यासाठी थर्मल ड्रोन, श्वानपथक यांचा वापर करण्यात आला. त्यानंतर बुधवारी (दि. 24) दुपारी तीन वाजता श्रुतिकचा मृतदेह आर्टिलरीच्या जंगलात आढळून आला. श्रुतिकचे वडील गंगाधर लष्करी जवान असून, ते मूळचे कर्नाटकचे आहेत. त्यांची एक वर्षापूर्वीच नाशिक रोडच्या आर्टिलरी सेंटरमध्ये बदली झाली होती. श्रुतिक हा एकुलता मुलगा होता.


