सावंतवाडी : “शाळा म्हणजे केवळ शिक्षणाचे केंद्र नसते, ती आपल्या संस्कारांची आणि आयुष्याला दिशा देणारी पायरी असते” याचे जिवंत उदाहरण कारिवडे-गोसावी वाडी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेत पाहायला मिळाले. या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आज उत्साहात पार पडला. जुन्या आठवणींना उजाळा देतानाच सर्व माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी खांद्याला खांदा लावून उभे राहण्याचा संकल्प केला.यावेळी शाळेच्या डिजिटल वर्गाचे उध्दघाटन सीताराम गावडे यांच्या हस्ते करण्यात आले.
या मेळाव्याचे अध्यक्षस्थान कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूजचे संपादक व सकल हिंदू-मराठा समाज जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे यांनी भूषवले, तर प्रमुख पाहुणे म्हणून रीक्षा युनियन कोकण विभागीय सचिव सुधीर पराडकर उपस्थित होते. दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. माजी विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
अध्यक्षस्थानावरून बोलताना सीताराम गावडे म्हणाले, “आजच्या पिढीसमोर खरी लढाई भारत-पाकिस्तानशी नाही, तर व्यसनांशी आहे. अमली पदार्थांचे सेवन तरुणाईचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहे. मुलांनी प्रथम आई-वडिलांना गुरु मानून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत. शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद तुमच्यात आहे. फक्त ध्येय, चिकाटी, आत्मविश्वास असला की यश तुमच्या चरणाशी येईल,” असे प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.
पराडकर यांनी आपल्या भाषणात गावाशी असलेले नाते अधोरेखित करत या भूमीने दिलेल्या संस्कारांचे स्मरण केले. मुख्याध्यापिका प्रगती सरमळकर यांनी शाळेच्या कार्याचा आढावा सादर केला, तर केंद्रप्रमुख वालावलकर यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मार्गदर्शन केले.
ग्रामपंचायत सरपंच श्रीमती आरती माळकर, जेष्ठ समाजसेवक अशोक माळकर, माजी सरपंच तानाजी साईल, ग्रामपंचायत सदस्या तन्वी साईल, प्रा. भाऊसाहेब गोसावी आदी मान्यवरांसह ग्रामस्थ, माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात माजी विद्यार्थी यशवंत गोसावी, अंकुश गोसावी, बाबली गोसावी, अरुण गोसावी, सिद्धेश गोसावी (ग्रामपंचायत लिपिक), नारायण गोसावी (BMC Auditor, मुंबई), पल्लवी गोसावी (पोस्टमास्तर), ममता गोसावी, अंकिता गोसावी यांसह अनेकांचा गौरव करण्यात आला.
हा स्नेहमेळावा म्हणजे फक्त भूतकाळातील आठवणींचा सोहळा नव्हता, तर शाळा आणि गावाच्या प्रगतीसाठी समाजाच्या एकजुटीचा ठोस संदेश होता. “आपण एकत्र आलो तर काहीही अशक्य नाही” या विचाराची जाणीव प्रत्येकाला करून देणारा हा कार्यक्रम खरोखरच प्रेरणादायी ठरला.
या कार्यक्रमाला कारिवडे ग्रामपंचायत सरपंच सन्माननीय श्रीम.आरती अशोक माळकर,जेष्ठ. समाजसेवक श्री. अशोक माळकर ,माजी सरपंच श्री. तानाजी साईल ग्रामपंचायत सदस्या श्रीम. तन्वी साईल कोल्हापूर स्वामी विवेकानंद कॉलेजचे माजी विभागप्रमुख प्रा.भाऊसाहेब गोसावी, माजी विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी श्री.दाजी गोसावी,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री .सचिन सुरेश गोसावी,पोलिस पाटील श्रीम.श्रुती गोसावी,जेष्ठ नागरिक-श्री.गोपाळ विठ्ठल गोसावी(भजनीबुवा)श्री. सुभाष रामा गोसावी,श्री. बाबीनाथ यशवंत गोसावी,श्री.रमेश खेमनाथ गोसावी,श्री.रामा सकनाथ गोसावी,श्रीम.रुक्मिणी विठ्ठल गोसावी,श्रीम. राधाबाई बाबीनाथ गोसावी.शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्री.गोपाळ गोसावी,श्री.संदिप सुरेश गोसावी,श्री.भिकाजी गोसावी,श्री.संदिप एकनाथ गोसावी,श्रीम.संजना गोसावी,संध्या गोसावी,प्रतिक्षा गोसावी,प्रणाली गोसावी मुख्याध्यापक श्रीम.प्रगती पांडुरंग सरमळकर: समाजसेवक श्री.आनंद तळवणेकर उपस्थित होते
मुलांनो भविष्यातील धोका ओळखून व्यसनांपासून दूर राहा! : सीताराम गावडे. ; कारिवडे-गोसावी वाडी शाळेचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा उत्साहात, समाज एकजुटीचा आणि प्रगतीचा संकल्प.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


