सावंतवाडी : यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या प्रायमरी विभागातील विद्यार्थ्यांनी ‘स्वच्छता हीच सेवा’ हे ब्रीदवाक्य घेऊन सावंतवाडी शहरात रॅली व पथनाट्याद्वारे जनजागृती केली. उद्या, २ ऑक्टोबर रोजी साजऱ्या केल्या जाणाऱ्या महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंतीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबवला.
रॅलीची सुरुवात श्रीराम वाचन मंदिरासमोरून झाली. त्यानंतर बाजारपेठेतून फेरी काढत विद्यार्थ्यांनी नागरिकांचे लक्ष वेधले. गांधी चौकात पोहोचून स्वच्छता व अहिंसेवर आधारित पथनाट्य सादर केले. घोषणाबाजी करत गांधीजींचा स्वच्छतेचा संदेश आचरणात आणा असे नागरिकांना आवाहन केले. यावेळी स्वच्छतेचा संदेश देणारी आपट्याची पाने तयार करून नागरिकांमध्ये वितरित करण्यात आली.
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुमित पिरणकर यांनी वाहतूक व्यवस्थापन करून कार्यक्रम होण्यास मदत केली. बाजारपेठेतील नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी शाळेच्या उपमुख्याध्यापिका अवंतिका नाईक, शिक्षववर्ग,- प्रीती डोंगरे, महादेवी मलगर, रसिका कंग्राळकर, महिमा चारी, रुतुजा तुळसकर, प्राची परब, बाबू भुसारी, संदीप पेडणेकर, सचिन हरमलकर आणि कर्मचारी अस्मिता परब, वैभवी बोवलेकर, महेश पालव, प्रकाश धुरी उपस्थित होते.


