नेमळे जवळ रेल्वे अपघातात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
सावंतवाडी: नेमळे येथील पुलाखालील रेल्वे ट्रॅक ओलांडताना आज सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास रेल्वेच्या धडकेने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. उदयभानू विजय सावळ (वय ३५, रा. मळगाव, सावळ वाडा) असे मृत तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उदयभानू सावळ हे अविवाहित होते आणि त्यांच्यावर मानसिक आजारासाठी उपचार सुरू होते. घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मुळीक हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून घटनेचा पंचनामा आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


