बांदा : लोकमान्य मल्टिपर्पज को ऑपरेटीव्ह सोसायटी लिमीटेड (मल्टी स्टेट) व श्री साईबाबा भक्त सेवा मंडळ, बांदा या दोन्ही संस्थाच्या संयुक्त विद्यमानाने शारदीय नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून दुर्गा मातेरूप ज्या नारी शक्तीत आपण पाहतो. त्या नारी शक्तीचा सन्मान नवमीला करण्यात आला. यावेळी नऊ महिलांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे उदघाटन बांदा ग्राम पंचायत सरपंच श्रीमती अपेक्षा नाईक यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री प्रवीण यादव (रिझनल मॅनेजर (लोकमान्य बँक) यानी भूषवीले. प्रमुख मान्यवर म्हणून सौ. अर्चना सरनाईक, (व्यवस्थापक) सौ. पल्लवी खानविलकर (बांदा शाखा व्यवस्थापक), सौ गौरी झूवेकर, श्री साईबाबा भक्त सेवा मंडळाच्या सदस्या सौ. दर्शना केसरकर, सौ. राजश्री तेंडले, सौ. अक्षता साळगांवकर, सौ. प्रियांका हरमलकर, सौ. अर्चना पांगम (माजी जि. प. सदस्य), सौ. अमिता स्वार आदि उपस्थित होत्या. या कार्यक्रमात समाजातील अशा महीला असतात ज्या आपल्या संसारात फक्त चूल व मुल यावरच न थांबता येण्याऱ्या . संकटावर मात करत धैर्याने तोडं देत, संघर्ष करून उभारी घेण्याचा प्रयत्न करत समाजाला एक आदर्श देतात अशा सर्वसामान्य महीलांचा सन्मान करण्यात आला.
यामध्ये ज्येष्ठ पत्रकार मंगल कामत, यश्वस्वीरित्या ‘पै भोजनालय’ चालवणा-या श्रीमती अक्षता अनंत पै, उत्कृष्ट रूग्ण सेवा देणाऱ्या आरोग्य सेविका सौ. शांती मनोहर कदम, बचत गटाना मार्गदर्शन करून महीलाना बॅकेतून आर्थिक सहाय्य मिळवून देणाऱ्या सौ. शिल्पा प्रसाद सावंत, उकृष्ट चित्रकार म्हणून कु. मेघा नितीन वाळके, दयासागर छात्रालय रेणापाल या छात्रालयात यशस्वी व प्रामाणिक सेवा देणाऱ्या कु. रत्नप्रभा एकनाथ केळुसकर, यशस्वी उद्योजीका सौ. उज्वला आनंद महाजन, आपला स्वत:चा लघु उद्योक सांभाळून यशस्वी व्यवसाय करणाऱ्या सौ. स्नेहा सतीश नाटेकर, उभाबाजार बांदा या मध्यवर्ती ठिकाणी भवानी भोजनालय यशस्वीपणे चालवणार्या सौ. सरोज वासुदेव येडवे यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी पल्लवी खानविलकर म्हणाल्या यांचा आदर्श समाजातील इतर स्त्रियांनी घ्यावा व अशा सामाजीक कार्यक्रमातून एक उर्जा देण्याचा आमचा प्रयत्न असेल. प्रवीण यादव सरानी शुभेच्छा दिल्या. अपेक्षा नाईक म्हणाल्या ही संकल्पना अतिशय चांगली आहे. अशा सामाजीक कार्यक्रमातून महिलाना वेगळी प्रेरणा मिळेल आणि हा आदर्श इतर महीला भगीनीनी घ्यावा. यावेळी साईबाबा भक्त सेवा मंडळाचे अध्यक्ष राकेश केसरकर, विश्वस्त साईराज सांळगावर, ज्ञानेश्वर येडवे, दयासागर क्षात्रालयचे व्यवस्थापक जिवबा वीर, डॉ. भक्ती आळवे, सौ. सुकन्या नाटेकर, सौ. मनीषा नाटेकर, सौ. स्मिता येडवे, भाजपा बांदा शहर महीला अध्यक्षा सौ. स्मिता पेडणेकर उपस्थित होत्या. प्रास्ताविक सौ. अर्चना सरनाईक यांनी केले. सूत्रसंचालन राकेश केसरकर यांनी तर आभार प्रियांका हरमलकर यांनी मानले.


