Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

गणित संबोध परीक्षेत इंग्लिश मीडियम स्कूल तळवडेचे सुयश!

सावंतवाडी : गुरुवर्य बी. एस. नाईक मेमोरियल ट्रस्ट संचलित इंग्लिश मीडियम स्कूल, तळवडेच्या विद्यार्थ्यांनी गणित संबोध परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळातर्फे आयोजित या परीक्षेसाठी इयत्ता आठवीमधून दहा विद्यार्थी तर इयत्ता पाचवीमधून पाच विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून प्रशालेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
यामध्ये इयत्ता आठवीतील पराग परेश परब आणि वेदांत उदय पाटकर यांनी 92 गुण प्राप्त करत प्रशालेत प्रथम क्रमांक पटकावला. पार्थ राजन मसुरकर याने 90 तर मानवी संतोष म्हारव हिने 88 गुणांसह अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला. याव्यतिरिक्त अस्मित सुभाष परब (84) अनुज भाऊराव तरिहाळकर (84), प्रांजल अनिल जाधव (74), तन्मय तुकाराम पिकुळकर (78), तेजन तुकाराम परब (74), रेहान विनायक साळगावकर (60) यांनी विशेष योग्यता व प्रथम श्रेणी प्राप्त केली.
इयत्ता पाचवीमधून सावी सुंदर मालवणकर हिने 88 गुण मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केला. जय सचिन सावंत (82), शुभ्रा स्नेहल राऊळ (80) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. उर्वरित आर्या पांडुरंग रेडकर (68) आणि शर्वाणी विनायक साळगावकर (44) यांनी देखील प्रथम श्रेणी प्राप्त केली. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेच्या गणित शिक्षिका प्रिया मल्हार व पूजा मोर्ये यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशालेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मैथिली मनोज नाईक, मुख्याध्यापक अजय बांदेकर, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग यांनी अभिनंदन केले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles