सावंतवाडी : महाराष्ट्रातील दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे निलेश सांबरे संस्थापक अध्यक्ष असलेल्या जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने आज नेमळे हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये जिजाऊ संस्थेच्या वतीने मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिजाऊ परिवाराचे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते अँड. नकुल पार्सॅकर यानी दानशूर व सेवाभावी समाजसेवक निलेश सांबरे हे सातत्याने गेली वीस वर्ष कोकणातील पाचही जिल्ह्यात पर्यावरण,रोजगार, शिक्षण ,आरोग्य अशा विविध क्षेत्रात काम करत असून हे सर्व सेवाभावी उपक्रम चॅरिटी म्हणून करतात. अँड.नकुल पार्सॅकर यानी या कार्यक्रमात जिजाऊ संस्थेच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला.
आतापर्यंत जिजाऊ संस्थेच्या वतीने जिल्ह्यातील बहुतेक शाळांना दिड लाखाहून जास्त मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या ष्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. कल्पना बोवलेकर यानी निलेश सांबरे यांचे आभार मानले.
मोफत वह्या वाटपाच्या या उपक्रमास संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष श्री प्रभूतेंडोलकर, सामाजिक कार्यकर्त्या सौ.मानसी परब, समुपदेशक श्रीमती अर्पिता वाटवे, सहशिक्षक अनिल कांबळे आदींच्या उपस्थितीत पार पडला.
‘जिजाऊ’ संस्थेच्या वतीने नेमळे हायस्कूलमध्ये मोफत वह्या वाटप!
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


