सावंतवाडी : दिनांक ०२/१०/२०२५ ते दि. ०८/१०/२०२५ पर्यंत गांधी सप्ताह असल्याने राज्य उत्पादन शुल्क सिंधुदुर्ग या कार्यालयाकडून दारुबंदी कायद्याअंतर्गत छापे मोहीम राबवून तसेच वाहन तपासणी व गस्त घालून दारुबंदी कायद्याअंतर्गत गुन्हे नोंद केले जातात. दि. ०३/१०/२०२५ रोजी दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक सिंधुदुर्ग यांना मिळालेल्या खात्रीशीर बातमीनुसार दोन पंच स्टाफसह दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये ता. सावंतवाडी येथे जावून खाजगी वाहनाने बातमीप्रमाणे वाहन हुंडाई कंपनीची सिल्व्हर रंगाची सेन्ट्रो झिंग चारचाकी कार क्र. एम.एच.१५ / बी. एक्स. १५८० व काळ्या रंगाची जीप कंपनीची चारचाकी वाहन क्रं. जी. ए. ०३/ वाय. १३६३ ही थांबवून तपासणी केली असता सदर वाहनांमधून गोवा बनावटी मद्याचे विविध बॅन्डचे एकूण ४५ बॉक्स किंमत रु.४,२९,०००/- व हुंडाई कंपनीची सिल्व्हर रंगाची सेन्ट्रो झिंग चारचाकी कार क्र. एम.एच.१५ / बी. एक्स. १५८० व काळ्या रंगाची जीप केपनीची कंपास चारचाकी वाहन क्रं. जी. ए. ०३/ वाय. १३६३ वाहनांची किंमत रु. १२,००,०००/- असा एकूण १६,२९,०००/- रु. किंमतीचा मुद्देमाल दारुबंदी कायद्याअंतर्गत जप्त करुन ताब्यात घेण्यात आला.

सदर कारवाईमध्ये संशयित इसम क्रं. ०१ दत्तात्रय भिमराव बंडगर (वय ५० वर्षे, रा. सांगली, संजयनगर, हनुमान मंदिराच्या मागे, ता. मिरज, जि. सांगली) व इसम क्रं. ०२. गजानन दिनकर पाटील (वय. ४९ वर्षे, रा. रुईकर कॉलीनी, लक्ष्मी अपार्टमेंट, फ्लॅट नं. २, ३, ता. करवीर, जि. कोल्हापूर) या इसमांवर दारुबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरील कारवाई अधीक्षक श्री. किर्ती शेडगे यांच्या मागदर्शनाखाली श्री. एस. ए. जाधव (निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक सिंधुदुर्ग) व श्री. एस. एन. पाटील (दुय्यम निरीक्षक) यांनी केली. सदर कारवाईमध्ये श्री. व्ही. एन. कदम, दुय्यम निरीक्षक, श्री. जी. एल. राणे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक, श्री. एस. एम. पाटील जवान, श्री. पी. व्ही. भोसले जवान, श्री. आर. आर. जानकर जवान, श्री. के. टी. पाटील जवान, श्री. आर. व्ही. शेटगे जवान तसेच श्री. आर. गुरव, निरीक्षक विटा, श्री. एस. पाटील, दुय्यम निरीक्षक विटा व त्यांचा स्टाफ यांनी मदत केली.
सदरील दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास श्री. एस. एन. पाटील, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक सिंधुदुर्ग करीत आहेत. तसेच यापुढेही अशीच कारवाई चालू राहील.


