Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

स्पर्धा परीक्षांमध्ये नावलौकिक मिळवा! : विक्रांत सावंत. ; ‘आरपीडी ’प्रशालेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार !

सावंतवाडी : भविष्यातील स्पर्धात्मक जीवनात यशस्वी होण्यासाठी स्पर्धा परीक्षांमध्ये नावलौकिक मिळवा, समाजातील प्रत्येक घडामोडीला ओळखून स्वतःच्या आयुष्यात यशस्वीतेकडे वाटचाल केली पाहिजे. संस्था नेहमीच आपल्या पाठीशी आहे, असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे नवनिर्वाचित अध्यक्ष विक्रांत सावंत यांनी केले. श्री. सावंत यांनी अध्यक्ष स्थान पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच आर.पी.डी. हायस्कूल व ज्यु. कॉलेजमधून २०२४-२५ मध्ये विविध स्पर्धा परीक्षांतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

यावेळी संस्था उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर , सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमोल सावंत , संचालक प्रा. सतिश बागवे, , प्रमुख उपस्थिती आणि देणगीदार डॉ सुर्वे, माजी पर्यवेक्षक श्रीम. चौकेकर ,माजी उपप्राचार्य प्रा. बाळासाहेब नंदिहळी , श्री. देवरकर तसेच मुख्याध्यापक श्रीम संप्रवी कशाळीकर , उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी प्रशालेत माध्यमिक विभाग इ.०८ वीमधून शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात प्रथम आलेला राणी पार्वतीदेवी हायस्कूलचा कु. सोहम बापूशेट कोरगावकर , जिल्ह्यात 12 वी कु. साक्षी रवींद्र गुरव , जिल्ह्यात 21 वी कु. तन्वी प्रसाद दळवी तसेच इ.०५ वीमधून शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण कु. शेटवे वैदेही सुरेश (प्रशालेत प्रथम) , कु. कुडतरकर प्रज्वल प्रविण (प्रशालेत द्वितीय) व कु. देऊसकर आरोही अमित – (प्रशालेत तृतीय) याचबरोबर श्री-बाबुराव वासुदेव मालवणकर (माजी कलाशिक्षक) पुरस्कृत प्रशालेत इंटरमिडीएट शासकीय ग्रेड परीक्षा – २०२४-२५ प्रथम श्रेणी प्राप्त कु. योगेश जोशी, कु. प्रणव साधले , कु. नक्षत्रा वर्णेकर , कु. साईश बांदेकर यांच्यासह श्रीम-विद्यादेवी पद्माकर प्रभू (माजी मुख्याध्यापक) पुरस्कृत कै. सदानंद हरी रेडकर ( ग्रंथपाल ) यांचे स्मरणार्थ निबंध स्पर्धा – २०२५-२६ प्रथम क्रमांक कु. जान्हवी करमळकर , द्वितीय क्रमांक कु. आद्या प्रभूगावकर , तृतीय कु. वैदेही शेटवे , वक्तृत्व स्पर्धा – २०२५-२६ प्रथम क्रमांक कु. उत्कर्ष आदारी , द्वितीय क्रमांक कु. आस्था लिंगवत , कथाकथन स्पर्धा – २०२५-२६ प्रथम कु. कर्तव्य बांदिवडेकर , द्वितीय कु. आर्या सावंत अशा सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना रोख रक्कम, भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. तसेच या यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे इ. ५ वी शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षिका श्रीम रेश्मा राणे , श्रीम प्रीती सावंत, श्रीम शुभांगी देसाई , इ. ८ वी शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षिका श्रीम मानसी नागवेकर , श्रीम स्वरा शिरोडकर , शिक्षक नामदेव मुठे , दशरथ शृंगारे तसेच मराठी भाषा शिक्षिका श्रीम पूनम कदम, कलाशिक्षक योगेश गावित यांनाही सन्मानित करण्यात आले. शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांसाठी कै.पार्वती व कै.महादेव लक्ष्मण धारगळकर यांचे स्मरणार्थ श्रीम.मुग्धा दिनेश नागवेकर पुरस्कृत , कै. पांडूरंग सीताराम नाईक व कै. सत्यभामा पांडूरंग नाईक स्मरणार्थ श्री. शेखर पांडूरंग नाईक (माजी उपमुख्याध्यापक) पुरस्कृत , कै.गंगाराम सीताराम देसाई यांचे स्मरणार्थ श्रीम-शुभांगी आत्माराम देसाई पुरस्कृत अशी अनेक बक्षिसे शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आली.
याप्रसंगी पालक-शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांमधून योगेश जोशी व कर्तव्य बांदिवडेकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्रीम संप्रवी कशाळीकर यांनी केले. आभार उपप्राचार्य सुमेधा नाईक यांना मानले. सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका श्रीम पूनम कदम यांनी केले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles