Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

महिलांनी आपल्या अंतर्भूत कौशल्यांचा विकास करावा! : विद्या तावडे.

सावंतवाडी : महिलांमध्ये कुटुंब चालवण्याची क्षमता असते तसेच समाजाचेही ती नेतृत्व करू शकते महिलांमध्ये प्रचंड क्षमता असून ती ओळखून त्यांनी आपल्या अंतर्भूत कौशल्यांचा विकास करावा, असे आवाहन चंदगड येथील दिशा सामाजिक संस्थेच्या विद्या तावडे यांनी केले.


सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग डायोसिजन डेव्हलपमेंट सोसायटी आणि डॉन बॉस्को संचलित कोकण डेव्हलपमेंट संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी नवसरणी येथे आयोजित करण्यात आलेल्या महिला नेतृत्व विकास कार्यशाळेत विद्या तावडे बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर सिंधुदुर्ग डेव्हलपमेंटचे डायोसिजन सोसायटीचे समन्वयक राजेंद्र कांबळे, सावंतवाडीच्या सीएसओ रेवती वालावलकर, मैत्री परुळेकर आदी उपस्थित होत्या.
यावेळी राजेंद्र कांबळे यांनी उपस्थित महिलांना महिला नेतृत्व विषयी बहुमोल मार्गदर्शन केले. ते म्हणाले, या कार्यशाळेतून महिलांना आत्मविश्वास, निर्णय क्षमता, सामाजिक भान, नेतृत्व गुण विकसित करण्याचे नवी प्रेरणा मिळणार आहे. तसेच महिलांचे नेतृत्व समाज परिवर्तनाचे शक्तिशाली प्रभावी साधन असुन अशा कार्यशाळेमधून गावा गावात महिलांचे सक्षम नेतृत्व घडणार आहे.


यावेळी घावनळे सरपंच यानी महिला सक्षमीकरणासाठी अशा महिला नेतृत्व विकास कार्यशाळांची गरज असून महिलांना यातून खूप काही शिकण्यासारखे आहे तसेच या कार्यशाळामधून वैयक्तिक विकासापेक्षा सार्वजनिक विकासाच्या दृष्टीने निडर नेतृत्व तसेच वकृत्व घडणार असल्याचे सांगून ही कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल सिंधुदुर्ग डेव्हलपमेंटचे डायोसिजन सोसायटी व कोकण डेव्हलपमेंट संस्था व डॉन बॉस्को यांच्या उपक्रमाचे कौतुक केले.
या कार्यशाळेत गेल्या तीन वर्षात ग्रामपंचायतमध्ये निवडून आलेल्या महिलांचे विविध विषयावरील प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात आले. या प्रशिक्षणात महिलांना ग्रामविकास, आर्थिक नियोजन नेतृत्व कौशल्य कायदेविषयक माहिती यांचे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच या प्रशिक्षणात युवक व युवती यांनाही वेगवेगळे शिक्षण देण्यात येणार आहेत. सिंधुदुर्ग डेव्हलपमेंटचे डायोसिजन सोसायटीच्या सीएसओ रेवती वालावलकर यांनी या कार्यशाळेचे उत्कृष्ट नियोजन केले. उपस्थितांचे आभार मैत्री परुळेकर यांनी आभार मानले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles