छींदवाडा : मध्य प्रदेशातील छींदवाडा येथील बालकांच्या मृत्यूने देशभरात दहशत पसरली आहे. येथे कफसिरप प्यायल्याने अनेक लहानग्यांच्या किडनी फेल होऊन त्यांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी आणखीन मुलांचा मृ्त्यू झाल्यानंतर या प्रकरणातील मृत्यूची संख्या आता ११ झाली आहे. त्यानंतर राज्य सरकारने कारवाई सुरु केली आहे. या कफसिरपची तपासणी लॅबोरेटरीत करण्यात आली आहे. त्यात प्रतिबंधित विषारी घटक आढळल्यानंतर मध्य प्रदेश सरकारने त्याच्या विक्रीवर बंदी घातली आहे. हे औषध लिहून देणाऱ्या डॉक्टरालाही अटक करण्यात आली आहे.
मध्य प्रदेशातील छींदवाडा भागात मुलांना कफसिरप दिल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. मध्य प्रदेश पोलिसांनी या प्रकरणात डॉ. प्रवीण सोनी यांना छींदवाडा येथील परासिया येथून अटक केली आहे. डॉ.प्रवीण सोनी परासियातील नामवंत बालरोग तज्ज्ञ आहेत. सर्दी तापाने त्रस्त मुलांना त्यांनी कोल्ड्रीफ कफ सिरप देण्याचा सल्ला दिला होता. या कफ सिरपचे सेवन केल्यानंतर अनेक मुले गंभीर आजारी बनली. त्यांची लघवी बंद झाली आणि त्यानंतर त्यांचा किडनी फेल होऊन मृत्यू झाल्याने खळबळ उडाली.
चौकशीत काय ?


