सावंतवाडी : आपल्या सावंतवाडी तालुक्यातील आणि एकूणचं तळकोकणातील सांस्कृतिक परंपरेचा अभिमान बाळगत युवकांनी ही जबाबदारी आपल्या खांद्यावर पेरणी नक्कीच सर्वांना अभिमानास्पद आहे असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे युवा नेते विशाल परब यांनी व्यक्त केले. सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड-जकात नाका येथे श्री गणेश मित्रमंडळातर्फे भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या शुभहस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी श्री. परब बोलत होते.

या सांस्कृतिक कार्यक्रमाला विशाल परब यांनी आपली उपस्थिती दाखवली. परंतु याच कार्यक्रमादरम्यान त्यांनी या कार्यकर्त्यांनी कर्जउभारणीतून वाद्ये खरेदी करत सुरु केलेल्या श्री स्वामी समर्थ बिट्सचे देखील उद्घाटन त्यांनी याप्रसंगी केले. या त्यांच्या कृतीने युवक भारावून गेले. मेहनतीतून उभे राहणाऱ्या कार्यकर्त्यांना उभारी मिळावी, हीच आपली इच्छा असल्याचे सांगत यावेळी श्री विशाल परब यांनी वाद्यवादनाचा आनंदही लुटला.

या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याच्या प्रसंगी विशाल परब यांच्या समवेत मळेवाड उपसरपंच हेमंत मराठे, नंदू नाईक, गुरु नाईक, अमोल नाईक, प्रीतम गावडे, प्रतीक नाईक, यांसह अनेक मान्यवर आणि नागरिक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


