सावंतवाडी : सावंतवाडी नगराध्यक्षपदासाठी खुला (ओपन) महिला आरक्षण जाहीर झाले आहे. यामध्ये सावंतवाडी शहराचा कारभार पाहण्यासाठी आता महिला (ओपन) उमेदवारांसाठी संधी खुली झाली आहे.
नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत आता २४७ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायतींचा समावेश आहे. या नगरपालिकांच्या निवडणुका डिसेंबर आणि जानेवारीच्या कालावधीत होणार आहेत.
आतापर्यंत ३, आता ‘चौथ्या’ लाडक्या बहिणीत रंगणार चुरस –
सावंतवाडीमध्ये आतापर्यंत तीन महिला नगराध्यक्षा पदावर राहिल्या आहेत. यात आनारोजिन लोबो, श्वेता शिरोडकर आणि विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्या सौभाग्यवती पल्लवी केसरकर. आता चौथी महिला नगराध्यक्ष कोण?, याबाबत सर्वत्र उत्सुकता लागली आहे.
नगरपालिकेतील राजकीय वातावरण आणि उमेदवारांची तयारी पाहता, आगामी निवडणुका विशेष लक्षवेधी ठरणार आहेत.


