मुंबई : राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे. या निवडणुका कधी होणार? याबाबत आता प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. या निवडणुकांसंदर्भात आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात येत्या 15 ते 20 नोव्हेंबरदरम्यान नगरपरिषद निवडणुका होण्याची शक्यता आहे. तर 15 ते 20 डिसेंबरदरम्यान जिल्हा परिषद निवडणुका होऊ शकतात, अशी माहिती समोर येत आहे.


