कुडाळ : औद्योगिक वसाहत ही माजी मंत्री स्व. एस्. एन्. देसाई यांच्या प्रयत्नातून आणि संकल्पनेतून बेचाळीस वर्षापूर्वी स्थापन झाली. सुरुवातीला कासवाच्या गतीने छोटे-मोठे उद्योग सुरु झाले. उद्योजकांच्या समस्या लक्षात घेऊन १९८८ मध्ये काही प्रमुख उद्योजकांनी एकत्र येवून कुडाळ एम्.आय.डी.सी. इंडस्ट्रीज असोसिएशनची स्थापना केली. मागच्या काही वर्षात असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या क्षमतेनुसार काही प्रश्न मार्गी लावले. गेल्या पाच वर्षात अनेक नव उद्योजकांनी कुडाळ औद्योगिक वसाहतीत विविध प्रकारचे उद्योग सुरु केलेले आहेत.
तीन वर्षापूर्वी श्री. मोहन होडावडेकर यांची असोसिएशनचे अध्यक्ष व अॅड. श्री. नकुल पार्सेकर यांची या कार्यवाह म्हणून निवड झाली. यांच्या नेतृत्वाखाली काही जुन्या व अनुभवी पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन उद्योजकांच्या महत्वाच्या प्रलंबित मागण्या पूर्णत्वास नेण्यासाठी सामुदायिक प्रयत्न केले. काही प्रश्न मार्गी लागले तर काही समस्या प्रलंबित आहेत. उद्योजकांसाठी सुरळीत व पूर्ण क्षमतेने विद्युत पुरवठा ही गरज लक्षात घेऊन गेल्या पस्तीस वर्षाहून जास्त काळ प्रलंबित असलेल्या वीज उपकेंद्राची प्रमुख मागणी मंजुर करुन घेण्यात असोसिएशनला यश मिळाले. संपूर्ण औद्योगिक वसाहतीत जुनाट पथदिवे वारंवार बंद पडत असल्याने काळोखाचे साम्राज्य होते. सुमारे साडे सहा कोटी रुपये यासाठी मंजुर होऊन औद्योगिक वसाहत प्रकाशमय झाली. सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे मालाची ने आण करणारी अवजड वहाने ही औद्योगिक वसाहतीत जाताना रहदारीची मोठी समस्या होती. सुमारे अठरा कोटी रूपये रस्ता रुंदीकरणासाठी मंजूर होऊन सदर कामही पूर्णत्वास गेले. या सगळ्यासाठी उद्योगमंत्री श्री. उदय सामंत, पालक मंत्री श्री. नितेश राणे, आमदार श्री. निलेश राणे, संबधित खात्याचे अधिकारी तसेच इतर लोक प्रतिनिधींचे मोलाचे सहकार्य लाभले. पर्यावरण प्रेमी नागरिक व उद्योजक यांच्या सहकार्याने “ग्रीन एम्. आय्. डी.सी. क्लिन एम्. आय्. डी. सी.” या संकल्पने अंतर्गत औद्योगिक वसाहतीत विविध प्रकारच्या पाचशे झाडांची लागवड करुन पर्यावरण पूरक उपक्रम यशस्वीपणे राबवला.
असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यानी उद्योजकांच्या समस्या बरोबरच अनेक सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम गेल्या तीन वर्षात प्रभावीपणे राबवले.
दिनांक ६ ऑक्टोंबर २०२५ रोजी सपंन्न झालेल्या असोसिएशनचा वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सर्व उद्योजक सभासदांनी पुन्हा एकदा श्री. होडावडेकर व अॅड. श्री. पार्सेकर यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त करुन त्यांची पुढच्या तीन वर्षासाठी असोसिएशनची धुरा सांभाळण्यासाठी एकमताने निवड केलेली आहे. असोशिएशनचे ज्येष्ठ सल्लागार श्री. द्वारकानाथ धुरी यांच्या मार्गदर्शनाखाली असोशिएशची त्रैवार्षिक निवडणुक प्रक्रीया पार पाडली.
सन २०२५ ते २०२८ या कालावधीसाठी नवीन कार्यकारीणी निवडण्यात आलेली असून ती पुढीलप्रमाणे –
अध्यक्ष – श्री. मोहन होडावडेकर.
उपाध्यक्ष – डॉ. नितीन पावसकर, श्री. आनंद बांदिवडेकर.
कार्यवाह – अॅड. नकुल पार्सेकर.
सहकार्यवाह – श्री. कुणाल ओरसकर.
खजिनदार – श्री. संतोष राणे.
सदस्य – श्री. संजीव प्रभू, श्री. शशिकांत चव्हाण, श्री. प्रमोद भोगटे, श्री. हरिषचंद्र वेंगुर्लेकर, श्रीमती. सुकरीन डीसोजा.
कायम निमंत्रित – श्री. उमेश गाळवणकर, श्री. अमित वळंजू, श्री. राजन नाईक, श्री. उदय शिरोडकर, श्री. दिलीप मालवणकर, श्री. मुश्ताक शेख, श्री. निलेश धडाम, श्री. किसन बिश्नोई, श्री. मंगेश तेर्से, श्री. हर्षवर्धन बोरडवेकर.
सल्लागार – श्री. द्वारकानाथ धुरी, श्री. कमलाकांत परब, श्री. राजाराम गवस, श्री. अशोक मेस्त्री
लेखा परीक्षक – श्री. सागर तेली.
कार्यालयीन व्यवस्थाप्रमुख – श्री. आग्नेल फर्नांडिस.


